मुंबई

वाशी रुग्णालयात लवकरच एमआरआय सुविधा

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ ः नवी मुंबई महापालिकेच्या वाशीतील सार्वजनिक रुग्णालयात लवकरच रुग्‍णांना एमआरआय सुविधा मिळणार आहे. रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य चाचण्या करण्यासाठी महापालिका एमआरआय मशीन खरेदी करणार असून त्याकरिता आरोग्य विभागातर्फे निविदा मागवणार आहे.
नवी मुंबई महापालिकेतर्फे आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचा वेळोवेळी प्रयत्न सुरू आहे. सध्या ऐरोली, घणसोली, वाशी, नेरूळ आणि बेलापूर या ठिकाणी सार्वजनिक रुग्णालय चालवण्यात येते. महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूती करण्यात येत होती. आता वाशी रुग्णालयात विविध आजारांवर शस्‍त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे.
वाशीतील सार्वजनिक रुग्णालय हे सध्या महापालिकेचे महत्त्वाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात नवी मुंबईसह महापालिका हद्दीच्या बाहेरून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून रुग्ण येतात. माफक दरात रुग्‍णांना महापालिकेतर्फे सुविधा दिल्या जातात. बऱ्याच आजारांमध्ये सीटीस्कॅन आणि एमआरआयसारख्या चाचण्या कराव्या लागतात. महापालिकेच्या रुग्णालयात या सुविधा नसल्यामुळे अनेकांना खासगी प्रयोगशाळेत जावे लागते. नवी मुंबईत वाशी, नेरूळ याठिकाणी असणाऱ्या खासगी प्रयोगशाळेत एमआरआय चाचण्या रुग्णांना खर्चिक ठरतात. अशा वेळी महापालिकेतर्फे खरेदी केली जाणारी एमआरआय करणारी मशीन अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना होणाऱ्या दुर्मिळ आजारांचे निदान करण्यासाठी महत्त्वाची ठरणारी आहे.

सीटीस्कॅन सुविधा उपलब्ध
नवी मुंबई महापालिकेतर्फे वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात सीटीस्कॅन सुविधा उपलब्ध आहे. ही मशीन महापालिकेला सीएसआर फंडातून उपलब्ध झाली आहे. या मशीनद्वारे महापालिकेने एका त्रयस्थ संस्थेमार्फत रुग्णांना माफक दरात सीटीस्कॅन सुविधा दिली जात आहे.

त्रयस्थ संस्थेमार्फत चालवणार मशीन
एमआरआय मशीन खरेदी करण्यासाठी १५ ते २५ कोटी रुपयांचा अंदाजे खर्च येणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेतर्फे निविदा मागवण्यात येणार आहे. त्याकरिता रेडिओलॉजिस्टची गरज असल्याने ही मशीनदेखील त्रयस्थ संस्थेमार्फत चालवण्यात येणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update: दोन दिवसांनंतर पावसाची उघडीप; आज-उद्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज

Gold Rate Today : सोने खरेदीचा विचार करत आहात? आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भावात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग...

Girl Video : गरिबीचा शाप! रस्त्यावर फुलं विकणाऱ्या चिमुरडीसोबत रिक्षा चालकानं केलं घाणेरडं कृत्य, हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल..

तुम्हालाही समोसा, जिलेबी खायला आवडते? मग थांबा, कारण सरकार लठ्ठपणाविरोधात आखतंय नवा प्लॅन

Mumbai Indians ने जिंकले १३ वे विजेतेपद! अंतिम सामन्यात मॅक्सवेलच्या संघाला चारली धूळ; रुशील उगारकर ठरला हिरो

SCROLL FOR NEXT