मुंबई

प्रेम टिकवायचे की नाही दोन्ही बंधूनी ठरवायचे!

CD

प्रेम टिकवायचे की नाही दोन्ही बंधूंनी ठरवायचे!
मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ‘महापालिका निवडणूक आली म्हणून आम्ही एकत्र आलो नाही. हिंदीसक्ती राज्य सरकारने आणली. विषय कोणी दिला? तुम्ही दिला, तर मराठी माणूस पेटून उठणारच. उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंनी आता ठरवायचे आहे, की त्यांचे प्रेम टिकवायचे की नाही,’ असे प्रतिपादन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाण्यात केले. विष्णूनगर येथील मनसेच्या कार्यालयाला त्यांनी रविवारी (ता. १३) भेट दिली. या वेळी त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
नांदगावकर म्हणाले, ‘राज ठाकरे यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. ते मराठीच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करीत नाहीत. त्यांनी हा विषय लावून धरला. हिंदीसक्तीचा विषय आणला नसता तर पुढचे घडल नसते. विषय तुम्ही आणला, तो धरून आम्ही पुढे गेलो. पालिका निवडणुका हा विषय नव्हता. अजून निवडणुका खूप लांब आहेत. त्याची तारीख पण निश्चित झाली नाही. इतर राजकीय पक्षांपेक्षा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर भाजपकडूनच अधिक बोलले जाते. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर पक्षाचे प्रवक्ते सोडून इतर लोक बोलतात म्हणून अडचण येते. कार्यकर्ते व्यक्त होत असतात, मग त्याची सावरासावर नेत्यांना करावी लागते. या अनुषंगाने कोणी काही बोलू नये,’ अशी सूचना राज ठाकरे यांनी केली होती.

..
राज ठाकरे यांचा १८ जुलैला मिरा-भाईंदर दौरा
मिरा-भाईंदर येथील घटनेबाबत नांदगावकर म्हणाले, ‘तुम्ही चुका करणार आणि आम्हाला विचारणार? तुम्ही महाराष्ट्र राहता तर मराठी बोलण्यात अडचण काय आहे? माझे ठाणे शहराशी जुने ऋणानुबंध आहेत. येथील दहीहंडी उत्सवाला मी खूप पूर्वीपासून येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हे येत्या १८ जुलैला मिरा-भाईंदर येथे येणार आहेत. तत्पूर्वी १४ ते १६ जुलैला इगतपुरी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांचे शिबिर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंगलातच मुलींचा जन्म, वडील कोण? २०१८पासून जंगल, गुहेत कशी राहिली रशियन महिला

Crocodile: ‘कृष्णा’नंतर आता कोयनेलाही ‘मगर’मिठी; कऱ्हाडला नागरिकांत औत्सुक्य अन् घबराट; पावसाळ्यात पाणी वाढल्‍याने वावर

Chhagan Bhujbal : राज्यसभेच्या प्रश्नावर भुजबळांचं मिश्किल उत्तर; शिळ्या कढीला ऊत कशाला आणता?

ATM Centre Theft : शेतकऱ्यांनो काळजी घ्या, एटीएम सेंटरमध्ये हातचलाखीने शेतकऱ्याला ४७ हजारांना लुटलं

"त्यांनी माझ्या वडिलांचं करिअर खराब केलं" डब्बू मलिकच्या लेकाचा काका अनु मलिकवर आरोप; "त्यांनी.."

SCROLL FOR NEXT