मुंबई

मुंबईचे रस्ते म्हणजे खड्ड्यांचा नकाशा

CD

मुंबईचे रस्ते म्हणजे खड्ड्यांचा नकाशा
सरकारचा लाडका कंत्राटदार कोण? आदित्य ठाकरे यांचा घणाघात

नालासोपारा, ता. १३ (बातमीदार) : ‘लोक चंद्रावर पोहोचले; पण मुंबईहून वसईला येताना किती वेळ लागतो, याचा विचार करा. आज मुंबईचे रस्ते म्हणजे खड्ड्यांचा नकाशा झाला आहे. एक किलोमीटर गाडी नीट चालू शकत नाही, या महामार्गांचा लाडका कंत्राटदार कोण,’ असा सवाल करीत आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. ते रविवारी (ता. १३) वसई जूचंद्र येथील शाखा उद्‍घाटन कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी रस्त्यांवरील दुरवस्था, सरकारच्या कथित फसवणुकीच्या योजना, संविधानाच्या सुरक्षेचा मुद्दा, तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांवर शिवसेनेची बांधिलकी या सर्व मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
नायगाव पूर्व जूचंद्र येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचे उद्‍घाटन रविवारी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेना नेते विनोद घोसाळकर, वसई-विरार जिल्हाप्रमुख प्रवीण महाप्रलकर, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत, जूचंद्र शाखाप्रमुख मोहन पाटील आणि विभागप्रमुख रूधयनाथ भोईर यांसह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आदित्य ठाकरे नाव न घेता भाजप आमदार संजय गायकवाड व संजय शिरसाट यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘आज चड्डी-बनियान गँग तयार झाली आहे. यांचे आमदार-मंत्री मर्सिडीजमध्ये बसतात, हुक्का-सिगारेट पितात; पण शिवसैनिक रस्त्यावर जनतेसोबत असतो, शाखा म्हणजे आमचे न्यायमंदिर आहे, जिथे कोर्ट नाही, पोलिस नाही तिथे शाखा आहे. शिवसेनेचा ६० वर्षांचा वारसा ही न्याय देण्याची परंपरा आहे, सध्याचे सरकार जनतेचे नाही तर निवडणूक आयोगाने निवडले आहे, लोकशाही वाचवायची असेल तर शिवसेनेलाच सत्तेत आणा,’ असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

संविधान आणि जनसुरक्षा
आज संविधानच धोक्यात आहे. भाजपचे खासदार संविधानविरोधी वक्तव्य करतात, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, जनसुरक्षा हा कायदा जनतेच्या नव्हे, तर सत्तेच्या सुरक्षेसाठी भाजपने आणला आहे. सरकारने धारावीची ३०० एकर जमीन आणि मुंबईतील १,६०० एकर जमीन पुनर्विकासाच्या नावाखाली अदाणींच्या घशात घालण्याचे षड्‍यंत्र सुरू केल्याचा घणाघात त्यांनी सरकारवर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ATM Centre Theft : शेतकऱ्यांनो काळजी घ्या, एटीएम सेंटरमध्ये हातचलाखीने शेतकऱ्याला ४७ हजारांना लुटलं

"त्यांनी माझ्या वडिलांचं करिअर खराब केलं" डब्बू मलिकच्या लेकाचा काका अनु मलिकवर आरोप; "त्यांनी.."

एकच झलक, सबसे अलग! 'Vivo X Fold 5' अन् 'Vivo X200 FE' स्मार्टफोनची भारतात एन्ट्री; परवडणारी किंमत, दमदार फीचर्स एकदा बघाच..

म्हणून मला तो व्हिडिओ बनवावा लागला... शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेने पुन्हा मांडली बाजू

Marathi Book Review: 'दि फायर ऑफ सिंदूर' : भारताचा दहशतवादावर प्रहार

SCROLL FOR NEXT