नाटकातून सायबर सुरक्षिततेबाबत प्रबोधन
प्रगती महाविद्यालयात पालक सभा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : प्रगती महाविद्यालयात पालक सभा आयोजित केली होती. या पालकसभेला एक वेगळीच दिशा मिळाली. क्विक हिल सायबर वॉरियर्स या विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हेगारी, फसवणूक व ऑनलाइन घोटाळ्यांवर आधारित एका प्रभावी आणि मनोरंजक नाटकाचे सादरीकरण केले. यातून त्यांनी पालकांची सुरक्षा आणि सतर्कता याबाबत प्रगती महाविद्यालय कला आणि वाणिज्य, डोंबिवली यांच्या वतीने क्विक हिल फाउंडेशन पुणे व महाराष्ट्र सायबर यांच्या संयुक्त सहकार्याने ‘सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम’ राबवला जात आहे. सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या घोषवाक्याने सायबर गुन्ह्यांविरोधात सावधतेचा संदेश या माध्यमातून देत विद्यार्थी, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिकांना सतर्क राहा, सुरक्षित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. या मोहिमेसाठी बीएससी आयटीचे क्लबचे श्रुती साहू, आदर्श उपाध्याय, अंजली दाभोळकर आणि गायत्री गन्नौरे व सायबर वॉरियर्सचा समावेश आहे. हे सर्वजण शिक्षक समन्वयक रूपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात श्रुती साहू यांनी सायबर सुरक्षेबद्दल माहिती देत केली. तिने सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, सायबर सुरक्षेचे महत्त्व आणि पालकांनी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला ऑनलाइन फसवणुकीपासून कसे सुरक्षित ठेवावे, यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एक रंगतदार नाटक सादर केले. ज्यामध्ये गाणी, शायरी आणि नाट्यमय प्रसंगाद्वारे सायबर फसवणुकीच्या घटना आणि त्यापासून बचावाचे उपाय अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडण्यात आले. ओटिपी फसवणूक, फिशिंग लिंक, संशयास्पद कॉल्स, बनावट गुंतवणूक योजना अशा विविध ऑनलाइन स्कॅमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सायबर धोके सजीवपणे उभे केले आणि त्यातून वाचवण्यासाठी उपायही सादर केले.
कार्यक्रमात अध्यक्ष जगन्नाथ पाटील, विष्णू म्हात्रे, दत्ता वझे, प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या नूतन पाटील, निरीक्षक लक्ष्मण इंगळे आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांची कल्पकता आणि मेहनतीचे कौतुक केले. नाटकाला पालकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
जबाबदारीने वागण्याचा संदेश
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी एकत्र येत सायबर सुरक्षा शपथ घेतली. डिजिटल दुनियेत सावध राहण्याचा आणि जबाबदारीने वागण्याचा संदेश दिला. क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, सहसंचालक अजय शिर्के, साक्षी लवंगारे, गायत्री केसकर व दिपू सिंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रगती कॉलेज आणि त्यांच्या क्विक हिल सायबर वॉरियर्सने सायबर जागरूकता वाढवण्यासाठी घेतलेला पुढाकार एक अनुकरणीय ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.