मुंबई

भर पावसात पाण्यासाठी टँकरचा आधार

CD

खारघर, ता. १४ (बातमीदार) : खारघरमधील स्पॅगेटी वसाहतमधील पारिजात सोसायटीत वर्षभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्‍यामुळे रहिवाशांवर पावसाळ्यातही टँकरचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. रहिवाशांनी चार दिवसांपूर्वी सिडकोच्या खारघर येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घातला. या वेळी अधिकाऱ्याने वॉल्व्ह बदलून पाणी समस्या दूर केला जाईल, असे आश्वासन दिले, मात्र तीन दिवस उलटले तरी दुरुस्‍ती न झाल्‍याने रहिवाशांमधून संताप व्यक्‍त होत आहे.
सिडकोने खारघरमधील स्पॅगेटी गृहसंकुलाची जाहिरात करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले बांधकाम, तरणतलाव, चोवीस तास पाणी असा उल्‍लेख करण्यात आला होता, मात्र सध्या या वसाहतीत सिडकोकडून केवळ दोन तास आणि तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात टँकरच्या पाण्यावर तहान भागवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी सोसायटीने सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी (ता. १२) सिडकोच्या खारघरमधील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घातला. या वेळी २४ तास नको, मात्र किमान दैनंदिन गरजा भागतील, एवढा तरी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली.
सिडकोने सोसायटीत पाणीपुरवठा होणाऱ्या वॉल्व्ह बंद केल्यामुळे वर्षभरापासून रहिवाशांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत असल्‍याचे रहिवाशांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या वेळी लवकरात लवकर नवीन वॉल्व्ह बसवला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले, मात्र चार दिवस उलटूनही पाणी समस्‍या जैसे थे असल्‍याचे दिसून येत आहे. या वेळी माजी नगरसेविका लीना गरड, ॲड बालेश भोजने यांच्यासह स्पॅगेटी वसाहतीमधील रहिवासी उपस्‍थित होते.

तीन लाख पाण्यात
स्पॅगेटी वसाहतीतील पाणी समस्या सोडवण्याबाबत सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे लेखी तक्रार केल्यावर सोसायटीतील जलवाहिनी वळणाची असल्‍याने पुरवठ्यात अडचणी येत असल्‍याने सांगण्यात आले. सरळ रेषेत जलवाहिनीची जोडणी केल्‍यास मुबलक पाणीपुरवठा होईल, अशी सूचना करण्यात आली. त्‍यामुळे सोसायटीने तीन लाख रुपये खर्च करून नवीन जलवाहिनीची जोडणी केली, मात्र तरीही पाणी समस्‍या जैसे थे असल्‍याने नागरिकांमधून सिडकोविरोधात रोष व्यक्‍त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ६ सप्टेंबर २०२५ ते १२ सप्टेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 6 सप्टेंबर 2025

अग्रलेख : तंत्रज्ञानाचे ‘विक्रम’ संवत!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT