मुंबई

इलेक्ट्रिक किचन चिमणीला आग

CD

इलेक्ट्रिक किचन चिमणीला आग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : शिवाई नगर, रवी इस्टेट बसस्थानकाजवळील लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी, डी विंगमधील अकराव्या मजल्यावरील रूम क्रमांक ११०२ मध्ये इलेक्ट्रिक किचन चिमणीला आग लागली. ही घटना सोमवारी (ता. १४) सायंकाळी ६च्या सुमारास घडली. या घटनेत इलेक्ट्रिक किचन चिमणी, इलेक्ट्रिक वायरिंग व इतर किचन साहित्य जळून नुकसान झाले आहे. शिवाई नगर येथील लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी, डी विंगच्या अकराव्या मजल्यावरील विष्णू पालेकर यांच्या घरात आग लागल्याची माहिती सागर नामक व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. अवघ्या काही मिनिटांत आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT