मुंबई

२० कोटींच्या शौचालयावरून वाद

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः शहरातील २० कोटींच्या शौचालय घोटाळ्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. शौचालयावरील खर्च करदात्यांच्या पैशांची लूट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई शहरात १४ ‘महत्त्वाकांक्षी शौचालये’ बांधण्याचे काम हाती घेतले आहे. याअंतर्गत ए वॉर्डमधील पाच ठिकाणांचा लायन गेट, ओव्हल मैदान आणि विधान भवन समावेश आहे. या ठिकाणी प्रत्येक शौचालयाची किंमत १.२५ कोटी ते १.७५ कोटींदरम्यान आहे. हा सार्वजनिक निधीचा गैरवापर असून, रस्त्यांची दयनीय स्थिती, झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असताना असा खर्च करणे अयोग्य असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे.
--------------------------------------------
मोबाईल शौचालयांचा पर्याय
दक्षिण मुंबईच्या सौंदर्याला बाधा पोहोचवणाऱ्या कायमस्वरूपी मोठ्या शौचालयांऐवजी पालिकेने युरोपियन शैलीतील मोबाईल शौचालयांचा विचार करायला हवा होता.  एका युनिट्सची किंमत फक्त २-५ लाख रुपये असून, स्थलांतराची लवचिकता, किमान पर्यावरणीय परिणाम आणि जाहिरातींच्या उत्पन्नाद्वारे सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी संधी उपलब्ध करून देतात, असेही मकरंद नार्वेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT