मुंबई

शासकीय रुग्णालयामागे गांजाविक्री

CD

उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयामागे असलेल्या परिसरातून गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १६०० ग्रॅम वजनाचा २२ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीने अमली पदार्थ कुणाकडून घेतले आणि कोणाला विक्रीसाठी आणले होते, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ जुलैला गस्त घालत असलेल्या गुन्हे शोध पथकाचे पोलिस नाईक सचिन पाटील यांच्यामार्फत माहिती मिळाली की शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश शेवाळे यांच्या नेतृत्वात पथकाने तत्काळ सापळा रचला. तेथे नवीन रामदास चिंचोळे (वय ३५) हा पिशवीसह संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अंगझडती केली असता त्याच्याकडे १६०० ग्रॅम गांजा आढळून आला. त्याच्याविरुद्ध मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला सोमवारी (ता. १४) न्यायालयात हजर केले असता १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याने गांजा कुणाकडून विकत घेतला, कोणाला विक्री करत होता, त्याचा परिसरात आणखी कुणाशी संपर्क आहे का, याची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT