मुंबई

कल्याण पूर्वेत विजेचा खेळखंडोबा

CD

कल्याण पूर्वेत विजेचा खेळखंडोबा
कल्याण, ता. १५ (बातमीदार) : शहरात होणाऱ्या सततच्या भारनियमनामुळे नागरिक, व्यापारी, शाळांना मागील काही दिवसांपासून प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत जाब विचारण्यात आला आहे. तसेच समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचाही इशारा या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेने दिला आहे.

महावितरणचे कल्याण पूर्व कार्यकारी अभियंता जगदीश बोडखे व सहाय्यक अभियंता राठोड यांना दिलेल्या निवेदनात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात विद्युतसाठा व पुरवठ्याचे भविष्यातील नियोजन करणे, अपुऱ्या कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करणे, तसेच वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे याबाबत त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. या वेळी शिष्टमंडळासोबत संतप्त नागरिक व व्यापाऱ्यांनी सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे निर्माण झालेल्या अडचणी मांडल्या. कल्याण पूर्वेतील वीजग्राहकांकडून सर्वाधिक वसुली होत असतानाही वीजपुरवठा सुरळीत न होणे, हे महावितरणचे अपयश आहे, असे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले.

आंदोलनाचा इशारा
कार्यकारी अभियंता बोडखे म्हणाले की, पडघा येथील मुख्य वीजवाहिनी केंद्रातील एक फिडर बंद असल्याने वीजपुरवठ्यात अडचणी येत आहे. त्यामुळे नाइलाजास्तव काही वेळ अघोषित भारनियमन करावे लागत आहे; मात्र या समस्येवर लवकरच सुधारणा होईल तसेच भविष्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले, तर याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा जाईल असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिल्याचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख नारायण पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT