मुंबई

वैद्यकीय अभ्यासक्रमाला महापालिकेकडून अनुदान

CD

वैद्यकीय अभ्यासक्रमाला महापालिकेकडून अनुदान
लाडक्या लेकीला डॉक्टर बनण्यासाठी एक लाखापर्यंत अर्थसहाय्य
नवीन पनवेल, ता. १५ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील मुलींना अर्थसहाय्य करण्यात येत आहे. पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत वैद्यकीय शिक्षणासाठी ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत एक रकमी अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत १९ विद्यार्थिनींनी या योजनेलचा लाभ घेतला असून, पालिकेचे आभार मानले आहेत.
सर्वच क्षेत्रात मुलींनी यश संपादन करत आपले कर्तृत्व उंचावले आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी आपले स्थान काबीज केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातही महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा मुलींना महापालिकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य दिले जात आहे. आतापर्यंत १९ मुलींना या अनुदानाचा लाभ मिळाला असून, अन्य विद्यार्थिनींनीही या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. पनवेल महापालिकेच्या २०२० मध्ये झालेल्या २६५ व्या ठरावानुसार एमबीबीएसला प्रवेश घेतलेल्या मुलींना एक लाख रुपये तर बीएएमएस, बीएचएमएस, डीडीएस या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना ५० हजार रुपये प्रत्येकी एकदाच याप्रमाणे अर्थसाहाय्य केले जाते. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन्ही अभ्यासक्रमाला प्रवेशित एकूण १९ मुलींना त्याचा लाभ झाला आहे. पहिल्या वर्षीची गुणपत्रिका जोडल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेताना या मुलींना अर्थसहाय्य दिले जाते. त्याचा फायदा मुलींना शिक्षणासाठी होत आहे.
.....................
योजनेच्या लाभासाठी पात्रता व अटी
लाभधारक पनवेल महापालिका क्षेत्रात किमान तीन वर्षे वास्तव्यास असल्याचा पुरावा आवश्यक आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक असून, पहिल्या शैक्षणिक वर्षाच्या निकालाच्या गुणवत्तेनुसार फक्त एकदाच लाभ मिळणार आहे. एमबीबीएसचे लाभार्थी उपलब्ध नसल्यास ते प्रमाणानुसार बीएएमएस, बीएचएमएसला वळवण्यात येतील. नगरसेवकांचे शिफारस पत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक असून, अंतिम अधिकार आयुक्तांकडे राखीव ठेवण्यात आला आहे.
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT