मुंबई

ओला-उबेर कंपन्यांविरोधात कॅबचालक आक्रमक

CD

अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : सरकारकडून ३२ रुपयांचा दर असूनही आठ रुपये किलोमीटरचा भाडेदर कॅबचालकांना मिळत असल्याने संतापलेल्या ओला कॅबचालकांनी अंबरनाथच्या हुतात्मा चौकात संप पुकारला. साधारण १०० गाड्या उभ्या करून जोपर्यंत आम्हाला ३२ रुपयांचा भाडेदर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हा संप सुरूच ठेवणार, अशी भावना कॅबचालकांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकार, तसेच विविध महापालिका परिवहन सेवेच्या बस प्रवाशांच्या तुलनेत अपुऱ्या पडत आहेत. यामुळे अनेक प्रवासी ओला, उबेर या खासगी कंपनीच्या वाहतुकीचा पर्याय निवडतात. या कंपन्यांच्या वाहनांना प्रवाशांची मोठी मागणी आहे. मात्र, दर कपात तसेच इतर विविध कारणांमुळे ओला, उबेरचालकांनी अचानक संप पुकारल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शहरातील हुतात्मा चौकात सुमारे १०० ओलाचालकांनी एकत्रित येऊन संप पुकारला. जोपर्यंत आम्हाला ३२ रुपयांचा भाडेदर मिळत नाही, तोपर्यंत हा संप सुरू राहील, असे चालकांनी सांगितले. दरम्यान, ओला, उबेर यांचा हा राज्यव्यापी संप डॉ. केशव शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, मुंबई येथील आझाद मैदानात या मोर्चाला हजारो ओला-उबेर चालकांनी पाठिंबा दर्शवला आहे.

आम्ही आठ ते नऊ लाखांची गाडी खरेदी करून कमीतकमी ७० ते ८० हजारांचा कर भरतो. त्याचप्रमाणे विमा व इतर खर्चही आहे. आम्हाला आठ रुपयांप्रमाणे दर मिळतो. शासकीय अध्यादेशानुसार ३२ रुपये प्रति किलोमीटर मिळण्याची मागणी आहे. सरकार व प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी सर्वसामान्य मालक व चालकांची पिळवणूक करत आहे. ही भयाण परिस्थिती ओलाची आहे.
- किशोर साठे, ओला चालक

आम्हाला ओला उबेरमुळे खूप त्रास सहन करावा लागतो. ग्राहकाकडून २०, २२, २५ रुपये भाडेदर घेऊन आम्हाला मात्र आठ रुपये देतात. यामध्ये आम्हाला कर, कर्ज, विमा भरायचा असतो. चुकून एखादी घटना घडल्यास दंडही भरावा लागतो. त्यामुळे आम्हाला मिळणारा भाडेदर हा खूप कमी आहे. शिवाय ५ टक्के कर कापला जातो. त्यामुळे आता या गाडीला आग लावावी का? अशी संतप्त प्रतिक्रिया चालकांनी दिली. दरम्यान, सरकार अध्यादेशानुसार भाडेदर मिळत नाही, तोपर्यंत हा संप सुरू राहील.
- नितीन शिंदे, चालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT