मुंबई

अलिबागमध्ये ३१ ग्रामपंचायतींवर महिलाराज

CD

अलिबाग, ता. १६ (वार्ताहर) ः तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये २०२५-३० या कालावधीत थेट सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवारी (ता. १५) सोडत काढण्यात आली. अलिबाग तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३१ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज निश्चित झाले आहे. तर ३३ जागा सर्वसाधारण म्हणजे खुल्या गटासाठी आरक्षित आहेत. थेट सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने सोडत कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित केला होता.
तहसीलदार विक्रम पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांची माहिती दिली. त्‍यानंतर मयूरी महाडिक या लहान मुलीने चिठ्ठ्या उचलून आरक्षण निश्चित केले. सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी एक, अनुसूचित जमातीसाठी ११, नागरिकांचा मागास प्रवर्ग १७, सर्वसाधारण वर्गासाठी ३३ आरक्षित जागा निश्चित केल्या.
अलिबाग तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींमधील ३१ ग्रामपंचायत या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यामध्ये अनुसूचित जमाती एक, अनुसूचित जमाती सहा, नागरिकांचा मागास प्रवर्ग आठ, सर्वसाधारण १६ अशा ३१ ग्रामपंचायतींमधील महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी आंबेपूर, अनुसूचित जमाती महिला राखीवमध्ये, कावीर, चिंचोटी, पेंढाबे, ढवर, मानकुळे, मानतर्फे झिराड तर अनुसूचित जमाती खुल्या गटासाठी आवास, नागाव, वेजाळी, पेझारी, शहापूर यांची निवड करण्यात आली. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी आठ महिला आरक्षित करण्यात आल्या. त्यामध्ये नवगाव, खंडाळे, शहाबाज, कुरकुंडी कोलटेंभी, खानाव, कुर्डूस, रेवदंडा, आक्षी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तर नागरिकांचा मागास प्रवर्ग खुल्या गटात सातिर्जे, वाडगाव, बामणगाव, चिंचवली, मुळे, रेवस, आगरसुरे, कामार्ले, बेलोशी यांचा समावेश होता. सर्वसाधारण गटातून १६ महिला आरक्षित करण्यात आल्या. त्यामध्ये झिराड, चेंढरे, थळ, किहीम, मापगाव, वेश्वी, वाघोडे, शिरवली, चैल, रांजणखार डावली, नारंगी, सासवणे, कुसुंबळे, परहूर, खिडकी, रामराज या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सर्वसाधारण खुल्या गटासाठी बेलकडे, कुरूळ, सहाण, धोकवडे, बोरीस, मिळकतखार, सारळ, बोरघर, पोयनाड, वाघ्रण, वरंडे, ताडवागळे, कोप्रोली, श्रीगाव, चरी, वरसोली या ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित करण्यात आले.

------------

खालापूरमध्ये ४५ पैकी २२ मध्ये महिला सरपंच
खालापूर, ता. १६ (बातमीदार) ः सरपंचपदासाठी आरक्षण पुन्हा नव्याने काढण्यात आले असून तीन महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनंतर सरपंचपदाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. आता खालापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत पुन्हा नव्याने काढण्यात आली. सोडतीकडे तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष असल्याने आरक्षण सोडतीसाठी मोठ्या संख्येने तालुक्यातून उपस्थिती होती. ४५ पैकी दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती, दहा ग्रामपंचायती अनुसूचित जमाती, १२ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग तर उर्वरित २१ ग्रामपंचायती सर्वसाधारण सरपंचपदासाठी आरक्षणपूर्वी काढलेल्या सोडतीप्रमाणे आहे. २२ ग्रामपंचायतींत थेट महिला सरपंच आहेत. आरक्षण सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीसाठी प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ, खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, पंचायत समिती वरिष्ठ गटविकास अधिकारी संदीप कराड उपस्थित होते.

..............

पेणमध्ये ६४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण

पेण, ता. १६ (वार्ताहर) : तालुक्याच्या ६४ ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. या वेळी तालुक्यात एकमेव अंतोरे ग्रामपंचायत ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आली असून यातील १४ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित तर सात ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. यासह नागरिकांचा मागास प्रवर्ग या खुल्या गटासाठी आठ ग्रामपंचायती तर यातील महिला प्रवर्गासाठी नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गासाठी १६ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.

पेण ः ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

SCROLL FOR NEXT