मुंबई

मल्टिप्लेक्समध्ये दोनशे रुपयांत चित्रपट!

CD

मल्टिप्लेक्समध्ये २०० रुपयांत चित्रपट!
कर्नाटक सरकारचा निर्णय; महाराष्ट्रातही मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : एकपडदा चित्रपटागृहासह मल्टिप्लेक्समध्ये कोणताही चित्रपट पाहण्यासाठी कर्नाटक सरकारने २०० रुपयांची कमाल मर्यादा लागू केली आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचे मनोरंजन क्षेत्रातून स्वागत करण्यात आले असून, महाराष्ट्र सरकारनेही असा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतेच अर्थसंकल्पात चित्रपटगृहातील तिकीटदराबाबत घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील मनोरंजन क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. राज्यात एकपडदा चित्रपटगृहांची संख्या जवळपास २०० ते २५०च्या दरम्यान आहे. तसेच सिनेपोलिस, पीव्हीआर-आयनाॅक्स, मीराज, मुक्ता इत्यादी मल्टिप्लेक्सची मोठी साखळी आहे. प्रत्येक मल्टिप्लेक्समध्ये २००पासून ते ५००, १,००० ते १,२०० रुपयांपर्यंत तिकीटदर आहेत. एवढे महागडे तिकीटदर सर्वसामान्य प्रेक्षकांना परवडणारे नसल्याने महाराष्ट्र सरकारनेदेखील राज्यात असा निर्णय घेण्याची मागणी होत आहे. तिकीटदर कमी केल्यास अधिकाधिक प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळतील आणि मराठीसह सर्वच प्रकारच्या चित्रपटांना नवसंजीवनी मिळू शकेल, असाही मुद्दा जाणकारांनी मांडला आहे.
----
चित्रपटसृष्टीसाठी घातक निर्णय
दिग्दर्शक महेश कोठारे यांनी कर्नाटक सरकारच्या निर्णयावर विरोधी मत व्यक्त केले. कर्नाटक सरकारचा हा निर्णय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत घातक आहे. माझी वस्तू मी कितीला विकावी हा निर्णय सर्वस्वी माझा असतो, असे कोठारे म्हणाले.
---
मल्टिप्लेक्समध्ये तिकिटाचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. त्यातच पाॅपकाॅर्न, समोसे तसेच थंड पेयांचे दर भरमसाट आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कर्नाटकप्रमाणे निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय सिनेमादिनी ९९ रुपये तिकीट असते. दर आठवड्यात दोन दिवस असे तिकीटदर ठेवल्यास प्रेक्षकसंख्या निश्चित वाढेल.
- समीर दीक्षित, भाजप चित्रपट आघाडीचे अध्यक्ष
---
कर्नाटक राज्याने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारही मराठी माणसाच्या हितासाठी आणि चित्रपटसृष्टीच्या भवितव्यासाठी योग्य निर्णय घेईल, असा ठाम विश्वास आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis: ‘’...तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात’’ ; उद्धव ठाकरे कडाडले!

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

SCROLL FOR NEXT