मुंबई

माधुरी हत्तीणीला हत्ती पुनर्वसन केंद्राकडे हस्तातंरित करा

CD

माधुरी हत्तीणीला हत्ती पुनर्वसन केंद्राकडे हस्तातंरित करा

कोल्हापुरातील जैन धार्मिक न्यासाला उच्च न्यायालयाचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : कोल्हापुरातील एका जैन धार्मिक न्यासाने तीन दशकांहून अधिक काळ ताब्यात ठेवलेल्या महादेवी नावाच्या (माधुरी नावाने प्रसिद्ध असलेल्या) हत्तीणीला गुजरातमधील जामनगर येथील विशेष हत्ती पुनर्वसन केंद्राकडे हस्तांतरित करा, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १६) दिले. धार्मिक अधिकार आणि प्राणी कल्याण यांच्यातील संघर्षात प्राणी कल्याण हे सर्वोच्च असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. 

महादेवीला दोन आठवड्यांच्या आत हस्तांतरित करण्याचे आदेश देताना या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र आणि गुजरातच्या मुख्य वन्यजीव अधिकाऱ्यांनी आवश्यक परवाने देण्याचे न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.  कोल्हापुरातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थेत १९९२पासून माधुरी ही हत्तीण आहे; परंतु धार्मिक परंपरेच्या नावाखाली या हत्तीणीचे व्यावसायिक शोषण केले जात असल्याचा आरोप प्राणी हक्कांसाठी लढणाऱ्या ‘पेटा’ने केला होता. त्यानंतर केलेल्या अनेक तक्रारी आणि तपासणीनंतर माधुरी हत्तीण चर्चेत आली होती. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर न्यासाने केलेल्या याचिकेवर निर्णय देताना या हत्तीणीला जामनगर येथील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या केंद्रात सद्यस्थितीला २३८ हत्ती राहतात. तसेच, या केंद्राने महादेवीला केंद्रात ठेवण्यास सहमती दर्शवली होती. 

तेलंगणा राज्य वक्फ बोर्डाने मोहरमनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत या हत्तीणीला सहभागी करण्यात आले होते. त्यासाठी चार लाख रुपये भाडे धार्मिक न्यासाला मिळाल्याचा आरोपही पेटाने केला होता. या हत्तीणीच्या शोषणाचे फोटोही न्यायालयात सादर केले होते. हत्तीणीला गर्दीत नेऊन दोरीने बांधण्यात आले व नियंत्रित ठेवण्यासाठी विविध शस्त्रांचा वापर केला, त्यामुळे तिच्या पायाला दुखापत असताना व तिला संधिवाताचा त्रास असूनही नियंत्रित करण्यात आल्याचाही आरोप केला.  या आरोपांच्या शहानिशेसाठी एक उच्चस्तरीय समिती न्यायालयाने स्थापन केली. या समितीने हत्तीणीच्या अनेक तपासण्या करून अहवाल सादर केला. या अहवालात ही हत्तीणीला विविध शारीरिक त्रास होत असल्याचे, तिच्या शरीराच्या विविध भागांवर दुखापतीच्या जखमा असल्याचे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshwardhan Sapkal: भाजपला काँग्रेसच्या नेत्यांची गरज का? हर्षवर्धन सपकाळ, संस्था वाचविण्यासाठी जगतापांनी पक्ष सोडला

Viral Video: ड्रायव्हरचा हॉर्न वाजवण्याचा अनोखा अंदाज, घरमालकीण फिदा! 'आय लव्ह यू'... म्हणत थेट लग्नच केलं, व्हिडिओ व्हायरल

Pune Airport: पुणे विमानतळावरून उड्डाणे वाढणार; मंत्री मोहोळ यांची माहिती, १५ स्लॉटसाठी लवकरच मार्गांची निश्‍चिती

Success Story: 'जिद्द अन्‌ कष्टाच्या बळावर श्वेता झाली अधिकारी'; दररोज १२ ते १४ तास अभ्यास, आईची साथ अन्‌ आजोबाची प्रेरणा

Mamata Banerjee: भाजपचा दृष्टिकोन लज्जास्पद; ममता,भाजप बंगालींना त्रास देत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT