मुंबई

सागरी वाहतूक,बंदर व्यवस्थापन साठी ‘स्किल मिशन’

CD

सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापनासाठी ‘स्किल मिशन’
ऑगस्टपासून आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. मत्स्य क्षेत्रातील महत्त्वाचे अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण आयटीआयमार्फत ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात येईल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन मनुष्यबळासाठी अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी मागणी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी बैठकीत केली.
बंदर आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता वारंवार भासत असते. सागरी वाहतूक आणि बंदर व्यवस्थापनमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन जेएनपीए, वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. जर शासनाने परस्पर आपल्या सहकार्यातून मनुष्यबळ तयार करून रोजगारनिर्मिती केली तर राज्याच्या विकासाला चालना मिळेल, शिवाय शासनाच्या विभागांना सहाय्य ठरेल, असे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी मत व्यक्त केले.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, की औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या भारताच्या कौशल्य विकास व्यवस्थेचा कणा आहेत, ज्या व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम युवक घडवतात. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उ‌द्योजकता विभागाकडून पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) मॉडेलनुसार आयटीआय संस्थांना जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचा उ‌द्देश आहे. हा सामंजस्य करार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत स्किल इंडिया मिशन, महाराष्ट्र आयटीआय आधुनिकीकरण धोरण २०२५ आणि शाश्वत विकास उद्दिष्ट यांच्याशी सुसंगत आहे. या निर्णयामुळे रोजगार निर्मिती होऊन आयटीआय काळानुरूप प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाली आहे. या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख, पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुमती जाखड उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Deshmukh: विधीमंडळात ज्या नितीन देशमुखांना मारहाण झाली ते नेमके कोण आहेत?

Kolhapur Killing Case : रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन बेनाडेचा खून, संशयित आरोपी पोलिसांना शरण; संकेश्र्वरात मृतदेहाचा शोध सुरू

Viral Video: हंड्यावर हंडा...! नॉन महाराष्ट्रीय सुनबाईच्या उखाण्याचा व्हिडिओ व्हायरल

Morning Diet: सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? डॉक्टरांनी सांगितले कारण

मे-जूनमध्ये शेतीत काम नसतं, शेतकरी रिकामेच असतात.. तेव्हा गुन्हेगारी वाढते; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं विधान

SCROLL FOR NEXT