
Karnataka Sankeshwar Killing : रांगोळी ग्रामपंचायत सदस्य आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन आण्णाप्पा बेनाडे (वय ३१, रा. माळभाग, रांगोळी, हातकणंगले) याचा कर्नाटकातील संकेश्वरजवळ खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लखनचा खून केल्याची कबुली काही संशयितांनी कोल्हापूर पोलिसांसमोर दिल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री घटनास्थळी गेले असून, त्याठिकाणी लखनच्या मृतदेहाचा शोध उशिरापर्यंत घेण्यात येत होता.