मुंबई

ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा

CD

दुर्गाडी किल्ल्याप्रकरणी ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा : आमदार भोईर
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका आणि या कामामध्ये हलगर्जी करणाऱ्या शासनाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज आमदार भोईर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे ही मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याच्या डागडुजीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा निधी वापरला जात असतानाही, कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असे भोईर यांनी सभागृहात सांगितले.
आमदार भोईर म्हणाले, की त्यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी केली असता, निर्माणाधीन भिंतीचा मोठा भाग त्यांच्यासमोरच कोसळला. या घटनेने शिवप्रेमी आणि कल्याणकरांमध्ये संतापाची भावना आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यामध्ये हलगर्जी करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि इतके महत्त्वाचे काम सुरू असतानाही महिनोंमहिने त्या ठिकाणी न येणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याची मागणी भोईर यांनी या वेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT