मुंबई

कल्याण पूर्वेत डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात नागरिक रस्त्यावर

CD

कल्याण पूर्वेत डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात नागरिक रस्त्यावर
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोड, वसंत वाटीका जवळील पालिकेच्या भूखंडावरील निर्माणाधीन डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात स्थानिक रहिवासी आज रस्त्यावर उतरले आणि निदर्शने केली.
कल्याण पूर्वेतील १०० फूट रोड, शिवरल चौक येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मलनिस्सारण आरक्षण क्र. ३३० येथे होत असलेल्या कचरा एकत्रीकरण, प्रेसिंग कचरा वाहतूक व कचरा गाड्यांच्या वाहनस्थळ प्रकल्पास स्थानिक रहिवाशांचा विरोध असून, या प्रकल्पाविरोधात रहिवासी आक्रमक झाले आहेत. हा प्रकल्प मानवी वस्तीपासून दूर स्थलांतर करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी सांगितले की, पालिकेने कल्याण पूर्वेतील आरक्षण क्र. ३३० या आरक्षणानुसार मलनिस्सारण, पाणीपुरवठा, उघान याऐवजी आरक्षणात बदल करून घनकचरा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे. याबाबत हरकती सूचना घेतल्या होत्या का, असा प्रश्न उपस्थित करत जोगदंद यांनी बेकायदेशीरपणे होत असलेल्या घनकचरा प्रकल्पाला विरोध असून, नागरी आरोग्याच्या दुष्टिकोनातून या परिसरात हा प्रकल्प होणार नाही, असा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT