मुंबई

बोरीवली तहसिल मधील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करा:

CD

‘बोरिवली तहसीलमधील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरू करा’
अस्लम शेख यांची विधानसभेत मागणी
मालाड, ता. १९ (बातमीदार) ः बोरिवली तहसील कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र दीड महिना बंद राहणार आहे, अशी माहिती मिळाली असून हे एवढ्या कालावधीसाठी बंद राहिले तर विद्यार्थ्यांनी जायचे कुठे, असा सवाल आमदार अस्लम शेख यांनी विचारला आहे. तसेच, हे आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी अस्लम शेख यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली होती.
अस्लम शेख म्हणाले, की बोरिवली तालुक्याच्या तहसील कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र दीड महिना बंद राहणार, अशी माहिती मला मिळाली आहे. आपले सरकार सेवा केंद्राच्या बाहेर व्हीएलई केंद्रांची यादी लावली आहे. तसेच, व्हीएलई केंद्रावर दाखले काढून देण्यासाठी भरमसाट रक्कम आकारण्यात येते, अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत. जे दाखले तहसील कार्यालयाच्या आपले सरकार केंद्रांवर ३४ एवढ्या कमी किमतीत मिळतात त्या दाखल्यांसाठी तीन ते चार हजार रुपये विद्यार्थ्यांकडून आकारले जात आहेत.
जून व जुलै हा शैक्षणिक प्रवेशांचा कालावधी असतो. विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक दाखले लागत असतात. अशात आपले सरकार सेवा केंद्र का बंद करण्यात आले? गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचे कुठे? ऐन शैक्षणिक प्रवेशाच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवून नव्या कंपनीला आपले सरकार सेवा केंद्राचे काम दिल्यामुळे हे सर्व घडत आहे, असे अस्लाम शेख यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

SCROLL FOR NEXT