बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी एकसंध शिक्षण प्रणाली
राष्ट्रीय बौद्धिक सशक्तीकरण संस्था आणि जय वकील फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार
खारघर, ता. १९ (बातमीदार) : बौध्दिक दिव्यांग मुलांसाठी एकसंध अभ्यासक्रमाची आवश्यकता ओळखून, राष्ट्रीय बौद्धिक सशक्तीकरण संस्था आणि जय वकील फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार नुकताच जय वकील स्कूल शिवडी मुंबई येथे शुक्रवारी (ता. १८) पार पडला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय बौद्धिक दिव्यांग व्यक्तीसाठी सशक्तीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थिती होते.
या कराराअंतर्गत दिशा अभ्यासक्रम, मल्टीसेन्सरी डिजिटल पोर्टल, वैयक्तिक शैक्षणिक उपक्रम भारतभर राबवले जाणार आहेत. यावेळी राजेश अग्रवाल यांनी सुलभ शिक्षण साहित्य विकास योजनेतंर्गत दिशा अभ्यासक्रमाचे इंग्रजी, हिंदी, मराठी व इतर भाषांतील साहित्य छापून मोफत वितरित केले जाईल. तसेच, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांना मान्यता दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी राष्ट्रीय बौद्धिक सशक्तीकरण संस्थेचे संचालक डॉ. बी. व्ही. रामकुमार म्हणाले, जय वकील फाउंडेशनसोबत सहकार्यामुळे गुणवत्तापूर्ण व एकसंध शिक्षण देशभरातील बौद्धिक दिव्यांग मुलांपर्यंत पोहोचणार आहे. तर जय वकील फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना चंद्रा यांनी दिशा अभियान महाराष्ट्रातील ४५० पेक्षा अधिक विशेष शाळांमध्ये यशस्वीपणे राबविले असून आता राष्ट्रीय बौद्धिक सशक्तीकरण संस्थेच्या राष्ट्रीय व्यासपीठावर ते पोहोचले ही आनंदाची बाब आहे. दिशा अभियान हा एक समग्र कार्यक्रम असून त्यामध्ये व्हीएकेटी तंत्रज्ञान, डिजिटल वैयक्तिक शैक्षणिक अभ्यासक्रम ट्रॅकिंग आणि शिक्षक प्रशिक्षण यांचा समावेश असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.