घाटकोपर (बातमीदार) ः गुरुपौर्णिमेच्या परंपरेचे औचित्य साधत, विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक गुरुवर्य स्व. श्री. प. म. राऊत सर यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त डॉ. वा. शं. मटकर संगीत विद्यालयाच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात गायन, वादन, नृत्य या तिन्ही कलांप्रकारात अत्यंत सुश्राव्य व नयनरम्य अशी सादरीकरणे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली.
संस्थेच्या माजी सीईओ कै. सौ. विद्या प. राऊत मॅडम यांच्या प्रेरणेतून १९८३ साली सुरू झालेली गुरुपौर्णिमेची ही परंपरा यंदा ४२ व्या वर्षात पदार्पण करत असून, संगीत विद्यालयाच्या समृद्ध, सांस्कृतिक परंपरेला यानिमित्ताने अनोख्या स्वरूपात सादर करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुरुपूजन सोहळ्याअंतर्गत संगीत विद्यालयाचा गुरुजन वर्ग तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन गोस्वामी यांनी गुरुतत्त्व, मनुष्य जीवनात कलेची आवश्यकता, कलाशिक्षणातील गुरुकिल्लीचे महत्त्व अधोरेखित करत, “कला ही केवळ उपजीविकेचे साधन नसून, ती माणसाला खऱ्या अर्थाने जगायला शिकवते,” असे विचार व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने सुरू केलेल्या विविध उपक्रमांचे तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे सुद्धा त्यांनी यावेळी कौतुक केले. आपल्या खास विनोदी शैलीत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.