मुंबई

शिधावाटप धान्याची बेकायदा विक्री

CD

घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः शिधावाटप धान्याच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश करत १८२ किलो तांदूळ जप्त केला आहे, तर या प्रकरणात घाटकोपर पोलिसांनी शराफत अली मोहम्मद नबी शाह आणि खेमचंद लखनलाल अग्रवाल यांना अटक केली आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश मौर्य यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई झाली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
घाटकोपरमधील जीवदया लेन येथील अगस्ती भवन परिसरात संशयित टेम्पो आढळला होता. त्यात ८६८३.०६० किलो तांदूळ आढळून आला, ज्याची किंमत सुमारे ३.५४ लाख रुपये आहे. आरोपीने एफसीआय गोदामातून २४० तांदळाच्या गोण्या उचलून अधिकृत दुकानात वितरित केल्या, तर उर्वरित खासगी दुकानात विकल्या होत्या. घाटकोपर विभागात हे धान्य बेकायदेशीररित्या हलवण्यात आले होते. धान्याच्या गोण्यांवर ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया फोर्टिफाईड राईस’ असे छपाई केलेली होती. याप्रकरणी शिधावाटप अधिकारी चैतन्य वानखेडे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'नागपुरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का? वसतिगृहातील त्या मुली प्रचंड घाबरल्या'; वडेट्टीवारांचा फडणवीसांवर निशाणा

Andre Russell! शेवटचा सामना.. आंद्रे रसेलने मैदान गाजवले, Six खेचून साईड स्क्रिनला पाडला होल; भावनिक Farewell

Healthy Gut: पावसाळ्यात दही खाऊ शकत नसाल तर पचन सुधारण्यासाठी 'या' 5 गोष्टी खा, पोट निरोगी राहील

Text Neck Syndrome: मोबाईलची सवय बनतेय मानेचं दुखणं! 'टेक्स्ट नेक सिंड्रोम' आहे तरी काय?

Pune : चौफुला कलाकेंद्रात गोळीबार? पोलिसांना पुरावे मिळेनात, थिएटर मालक म्हणतो, असं घडलंच नाही

SCROLL FOR NEXT