मुंबई

‘त्या’ आरोपीचा जामीन रद्द करा

CD

‘त्या’ आरोपीचा जामीन रद्द करा
नीलम गोऱ्हेंनी घेतली गंभीर दखल

उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : उल्हासनगरातील रमाबाई टेकडी परिसरात दोन मुलींवरील विनयभंग प्रकरणातील आरोपीने जामिनावर सुटताच ढोल-ताशांच्या गजरात थेट पीडितांच्या घरासमोर मिरवणूक काढली होती. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीचा जामीन तातडीने रद्द करून कठोर कारवाईची मागणी पोलिस महासंचालकांकडे केली आहे.
या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘गुन्हा करून सुटलेला आरोपी जामिनावर सुटल्यावर पीडितांच्या दारात वाजतगाजत मिरवणूक काढतो, हे केवळ अन्यायकारकच नव्हे, तर कायद्याचा अपमान करणारे आहे. जामिनाच्या अटींचे स्पष्ट उल्लंघन झाल्याने आरोपी रोहित झा याचा जामीन तातडीने रद्द करण्यात यावा. या प्रकारामुळे पीडित कुटुंब पुन्हा मानसिक धक्क्यात गेले असून, अशा घटनेने समाजात कायद्यावरचा विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे पोलिसांनी यामध्ये विलंब न करता नवीन गुन्हा दाखल करून आरोपीला ताबडतोब अटक करावी. याशिवाय जामिनाच्या अटींचे उल्लंघन आणि न्यायप्रक्रियेत अडथळा आणल्यामुळे कोर्टात सविस्तर अहवाल सादर करून जामीन रद्द करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव दाखल केला जावा.’’
नीलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी त्यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याशी चर्चा केली. पोलिसांकडून तत्काळ पावले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पीडित मुलींना संरक्षण देणे, समुपदेशन करून मानसिक आधार देणे आणि परिसरात अशा प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष पथकाची नेमणूक करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देताच जयंत पाटील मतदारसंघात, कार्यकर्ता बैठकीत काय झाली चर्चा...

IND vs ENG 4th Test: गौतम गंभीरचं ठरलं, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल! एका अनपेक्षित खेळाडूची एन्ट्री

Latest Maharashtra News Updates : विठुरायाचे व्हिआर दर्शन

Gatari Amavasya 2025 Marathi Wishes: सणात सण गटारीचा सण...! गटारी अमावस्येच्या मित्र-परिवाराला पाठवा हटके शुभेच्छा

Suraj chavan Arrest : मारहाण भोवली ! अखेर राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणला अटक, मध्यरात्री पोलिसांना शरण अन्...

SCROLL FOR NEXT