मुंबई

तळीरामांवर वाहतूक विभागाची कारवाई

CD

अंबरनाथ, ता. २४ (वार्ताहर) : वाहतूक विभागाने दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यावर आणि विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी १५० वाहने जप्त केली आहेत. सुमारे १० लाख ६० हजारांचा दंड आकारल्याची माहिती अंबरनाथ वाहतूक विभागाचे अधिकारी विजय पुराणिक यांनी दिली आहे.
सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत असून, सध्या तळीरामांची चंगल उडाली आहे. त्यानिमित्ताने शहरात उत्साही वाहनचालकांकडून सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. रिक्षा व दुचाकीचालक दारू पिऊन वाहतूक करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. हे वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अनेकांच्या जीवाशी खेळतात. दरम्यान, गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू आहे. जून व जुलै अशा दोन महिन्यांत १५० वाहनांवर दंडात्मक कारवाई करून वाहने जप्त केली आहेत. यामध्ये विनापरवाना आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांचा समावेश आहे. यातील काहींवर न्यायालयीन कारवाईही करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाने अशा वाहनचालकांवर प्रत्येकी दहा हजारांचा दंड आकारला आहे. अंदाजित १० लाख ६० हजारांचा दंड आकारल्याची माहिती अधिकारी पुराणिक यांनी दिली. दरम्यान, तळीरामांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, स्वतःचे व इतरांचे जीवन धोक्यात घालू नका, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note Update: RBI कडून 2 अब्ज प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच चलनात! केंद्रीय मंत्र्यांची संसदेत माहिती; कागदी नोटा बंद होणार?

सलग ५ निर्धाव षटकं अन् ५ विकेट्स; Justin Greaves इतिहास घडवला, पाकिस्तानने गुडघे टेकले; ७ फलंदाज ३८ धावांत तंबूत Video

Latest Live Updates Marathi : गोदावरीची पूर परिस्थिती सलग आठव्या दिवशी कायम

Commonwealth Games: कारगिल योद्ध्यांना विजय समर्पित... पाकिस्तानी बॉक्सरचा धुव्वा उडविल्यानंतर भारताच्या जादुमानीची भावना

Shalarth ID Scam : 841 बोगस शिक्षक अन् 160 कोटींची फसवणूक! शालार्थ घोटाळ्यात मोठा मासा गळाला; भाजप नेत्याच्या अटकेने खळबळ, संस्थाचालकाच्या फलटणमधून आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT