मुंबई

भिवंडीतील शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला

CD

भिवंडी, ता. २४ (बातमीदार) : विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्ग प्रकल्पासाठी भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन सुरू आहे. त्यासाठी मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे इतर प्रकल्पांप्रमाणे या शेतकऱ्यांनाही योग्य व न्याय्य मोबदला मिळावा, अशी मागणी आमदार महेश चौघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या महामार्गामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. विरार, भिवंडी, पेण, कळंबोली हे भाग जेएनपीटी बंदर व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडले जातील. परिणामी, या परिसराचा औद्योगिक व आर्थिक विकास वेगाने होईल. या प्रकल्पाअंतर्गत भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी बाधित होत आहे. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांना नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. मात्र, भिवंडी तालुक्यातील जमिनींच्या तुलनेत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळत आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकरी असंतुष्ट आहेत.
त्यामुळे विरार-अलिबाग महामार्ग प्रकल्पासाठी नव्याने दर निश्चिती करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात यावी. भिवंडी तालुक्यातील सर्व प्रकल्पबाधित जमिनींना सरसकट ‘गुणांक २’ लागू करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळू शकेल. सध्या २१ दिवसांची भूसंपादन संमतीची मुदत वाढवून किमान ६० दिवसांची द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना आपली बाजू समजावून सांगण्यास आणि कायदेशीर सल्ला घेण्यास पुरेसा वेळ मिळेल, अशा मागण्या चौघुले यांनी सरकारकडे केल्या आहेत. या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. चौघुले यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पावसाचा जोर पुन्हा वाढणार! महाराष्ट्रात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता

MPSC Paper Leak News: औषध निरीक्षक भरती परीक्षेवर पेपरफुटीचा आरोप, एमपीएससीचा इन्कार; अफवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Latest Marathi News Live Update: दुबईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

Marathi Children’s Play: हैदराबादमध्ये मराठीचा डंका: ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ बालनाट्याने आंतरराष्ट्रीय रंगमंचावर जिंकली मने

Free Education: जगातील 'या' देशांमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत...सरकारच उचलते सर्व खर्च!

SCROLL FOR NEXT