Maharashtra Heavy Rain Alert
esakal
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांसह शेतकऱ्यांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.