मुंबई

नागाव ग्रामस्थांना उधाणीची धास्ती

CD

नागाव ग्रामस्थांना उधाणाची धास्ती
किनाऱ्यावरील बंधारा उद्ध्वस्त, सुरूच्या झाडांचे नुकसान
अलिबाग, ता. २६ (वार्ताहर)ः तालुक्यातील नागाव समुद्रकिनाऱ्यावर सहा किलोमीटरचा बंधारा लाटांच्या माऱ्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. किनाऱ्यावरील सुरूची झाडेही उन्मळून पडली आहेत. यामुळे भरतीचे पाणी गावात शिरण्याची भीती आहे.
अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्रकिनारा पर्यटकांसाठीचे आवडते पर्यटनस्थळ होते. या ठिकाणी पर्यटकांसाठी हॉटेल, कॉटेजेसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र सद्यःस्थितीत किनाऱ्यांचे रक्षण करणारा बंधारा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. बंधाऱ्याचे दगड लाटांच्या माऱ्यामुळे निखळून पडले आहेत. तर किनाऱ्यावरील सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे मुसळधार पावसात उधाणाचे पाणी गावात शिरण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
-----------------------------
मोठ्या दुर्घटनेची शक्यता
नागाव समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. येथील बंधारा नामशेष झाला आहे. ४० ते ५० वर्षांपूर्वीची झाडे उन्मळून पडत आहेत. उधाणाचे पाणी गावात शिरण्याची भीती वाढली आहे, त्यामुळे एखादी मोठ्या दुर्घटनेची शक्यता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. सचिन राऊळ यांनी सांगितले.
-------------------------------
ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार
समुद्रकिनारी भराव टाकून बंधाऱ्याची पुनर्बांधणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक - महाजन

सावली, तारा की ऐश्वर्या कोण मारणार बाजी? 'सावळ्याची जणू सावली'मध्ये रंगणार 'आम्ही सारे खवय्ये'ची मेजवाणी

Nashik Crime : 'जीएसटी' बनावट सॉफ्टवेअर प्रकरण; देवळालीतील इंजिनिअर ताब्यात, गुप्तचारांची झडती सुरू

Women's Chess World Cup : दिव्या-हंपी पहिला डाव बरोबरीत, महिला विश्वकरंडक बुद्धिबळ; दोघींनीही वर्चस्वाची संधी गमावली

Nagpanchami Special Recipe: नागपंचमीला घरच्या घरी बनवा पौष्टिक ज्वारीच्या लाह्या, लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT