मुंबई

वसंत विहार सिग्नलवरील मंडपाचा वाहतुकीला अडथळा

CD

सिग्नलवरील मंडपाचा वाहतुकीला अडथळा
महापालिका, वाहतूक पोलिसांची परवानगी आश्चर्याची
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : एकीकडे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असतानाच वसंत विहार नाक्यावर गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेकेदाराच्या भल्या मोठ्या मंडपाला महापालिका व वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली आहे. यावर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मंडपामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून, पादचाऱ्यांना चालण्यासाठीही जागा राहिलेली नाही.
महापालिकेकडून गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात गणेशमूर्ती व दुर्गामूर्तीच्या विक्रीसाठी रस्त्यालगत तात्पुरते मंडप उभारण्यास परवानगी दिली जाते. प्रामुख्याने वाहतुकीला अडथळा येऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी ही मुख्य अट आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्लॅडी अल्वारीस रोडवरील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ते वसंत विहार नाक्यादरम्यान गणेशमूर्ती विक्रीसाठी भल्या मोठ्या मंडपाला परवानगी दिली आहे. इतकेच नव्हे तर कंत्राटदाराने एका चारचाकी मोटारीसाठीही मंडपाचा विस्तार केला. या मंडपात गणेशमूर्ती विक्रीसाठी मांडल्या असून, गणेशमूर्ती पसंतीसाठी येणाऱ्या भक्तांची वाहने मंडपाजवळच उभी केली जातात. तर मंडपाच्या मागील बाजूला सायंकाळनंतर काही वेळा मद्यपींचा वावर व अंधार असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे.

वाहनांच्या लांबच लांब रांगा
वसंत विहार नाक्यावर काही दिवसांपासून सिग्नल सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यात लांब मंडपामुळे परिस्थिती आणखी कठीण झाली आहे. एकीकडे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी पार्किंगची नियमावली जारी केली आहे; मात्र वसंत विहार नाक्याजवळ परवानगी दिलेल्या भल्या मोठ्या मंडपाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: कच्चे तेल 10% ने घसरले! पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

Latest Live Updates Marathi : विरार-भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Ratnagiri Leopard Deaths : कोकणात बिबट्यांची डरकाळी धोक्यात? 11 वर्षांत 90 बिबट्यांनी गमावला जीव; वन विभागाकडून रेस्क्यूचे प्रयत्न सुरू

पोट चाकूने कापेन! धमकावत ६५ वर्षीय वृद्धाचा सख्ख्या बहिणींवर अत्याचार, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT