मुंबई

सहा महिन्यांत १२८ कोटी ६६ लाख ६८ हजार रुपयांची आर्थिक मदत

CD

गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आधार
सहा महिन्यांत १२८ कोटी ६६ लाख ६८ हजार रुपयांची आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी गरीब आणि गरजू रुग्णांसाठी एक मोठा आधार ठरत आहे. यावर्षी जानेवारी ते जूनपर्यंत या सहाय्यता निधीच्या माध्यमातून १४ हजार ६५१ रुग्णांना १२८ कोटी ६६ लाख ६८ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. या सहा महिन्यांत न्यूरो-संबंधित आजारांनी ग्रस्त रुग्णांना सर्वाधिक मदत मिळाली आहे. त्यानंतर अपघातग्रस्त आणि कर्करोगाच्या रुग्णांना आर्थिक मदत मिळाल्याची माहिती आकडेवारीतुन समोर आली आहे.


गेल्या सहा महिन्यांतील आकडेवारी
आजार रुग्णांची संख्या आर्थिक मदत (कोटींमध्ये)
न्यूरोलॉजिकल आजार २,७०९ २२,२६,८४,०००
अपघाती शस्त्रक्रिया १,९८३ १८,३१,८२,०००
कर्करोग शस्त्रक्रिया १,८६१ १८,०२,८०,०००
हिप बदलणे १,६५८ १६,२१,९४,०००
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग १,५०९ १४,२३,६७,०००
गुडघा बदलणे ८०४ ४,०४,१५,०००
लहान मुलांच्या शस्त्रक्रिया ७८२ ६,३२,९१, ५००
कर्करोग केमोथेरपी/रेडिएशन ६९१ ३,५९,३५,०००
रस्ते अपघात ५७८ ४,६९,८५,०००
नवजात मुलांचे आजार ५७२ ३,२४,११,०००
डायलिसिस ३८० १,८९,६६,१००
किडनी प्रत्यारोपण ३२९ ६,४२,७५,०००
कर्करोग उपचार ११७ १,००,५५,०००
अस्थिमज्जा प्रत्यारोपण ११५ २,२५,६५,०००
यकृत प्रत्यारोपण ६९ १,३५,५०,०००
कॉक्लियर इम्प्लांट ५८ १,१२,५०,०००
विशेष प्रकरणे १८७ १,८१,५३,५००
हाडांच्या शस्त्रक्रिया १४१ ७० लाख ६९,०००
भाजण्यासाठी उपचार ९६ ५१ लाख ९०,०००
हृदय प्रत्यारोपण १२ १६ लाख ५०,०००

अशी मिळवा मदत
- टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक १८०० १२३ २२११
- ऑनलाइन आणि पारदर्शक प्रणाली
- जिल्हास्तरीय मदत कक्ष
- अर्ज करण्यासाठी, https://cmrf.maharashtra.gov.in संकेतस्थळ
-भरलेला फॉर्म पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा
-आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा.
- ई-मेल आयडी aao.cmrf-mh@gov.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: अमृतसरमध्ये पाकिस्तानशी संबंधित ५ प्रमुख तस्टकरांना अटक

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT