मुंबई

रुग्णांना ही समजेल डॉक्टरांचा इतिहास, बनावट डॉक्टरांपासून सुटका , वैद्यकीय शिक्षण विभागाला एमएमसी पाठवणार प्रस्ताव

CD

एमबीबीएस डॉक्टरांना क्यूआर कोड बंधनकारक?
एमएमसी पाठवणार प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्यातील बनावट डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी, राज्य सरकार आता संबंधित कायद्यात सुधारणा करणार आहे. याअंतर्गत, राज्यात प्रॅक्टिस करणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना त्यांच्या क्लिनिकमध्ये क्यूआर कोड लावणे बंधनकारक केले जाईल. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून (एमएमसी) राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल. तो मंजूर होताच त्याची अंमलबजावणी केली जाईल.
माहितीच्या अभावामुळे सामान्य लोक अनेकदा डॉक्टरांचा बोर्ड पाहूनच कोणत्याही क्लिनिकमध्ये उपचारासाठी जातात. बनावट पदवी असलेल्या बनावट डॉक्टरांची औषधे खाऊन रुग्णांना अनेकदा शारीरिक आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा बनावट डॉक्टरांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि योग्य डॉक्टर ओळखण्यासाठी, एमएमसीने ‘नो युवर डॉक्टर’ मोहीम सुरू केली होती. याअंतर्गत सर्व एमबीबीएस डॉक्टरांना क्यूआर कोड घेण्यास सांगितले होते; परंतु चार महिन्यांत केवळ १०,००० डॉक्टरांनी क्यूआर कोड घेतला आहे. १४ जुलैला पावसाळी अधिवेशनादरम्यान अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत बनावट डॉक्टरांच्या वाढत्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला. यावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी डॉक्टरांसाठी क्यूआर कोड प्रणाली अनिवार्य करण्याबाबत सभागृहाला माहिती दिली होती. याअंतर्गत एमएमसीने सर्व एमबीबीएस डॉक्टरांना क्लिनिकमध्ये क्यूआर कोड लावणे अनिवार्य करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.
...
दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई!
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले, की आतापर्यंत क्यूआर कोड नियम ऐच्छिक क्षेत्रात ठेवण्यात आला होता; मात्र आता तो अनिवार्य केला जाईल. यासाठी एक प्रस्तावदेखील तयार करण्यात आला आहे, जो राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. त्यांनी सांगितले, की प्रस्ताव मंजूर होताच, एमएमसी डॉक्टरांना पुन्हा क्यूआर कोड बसवण्यासाठी नोटीस बजावेल. क्यूआर कोड प्रणालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करता येईल.
...
राज्यात दोन लाख एमबीबीएस डॉक्टर
डॉ. विंकी रुघवानी म्हणाले, की राज्यात एक लाख ९० हजार एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यापैकी एक लाख ४० हजार डॉक्टरांनी त्यांची नोंदणी नूतनीकरण केली आहे. कौन्सिलकडून ‘नो युवर डॉक्टर’ मोहिमेअंतर्गत, डॉक्टरांना क्यूआर कोड दिले जात आहेत. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर, डॉक्टरांची पदवी, नोंदणी इत्यादी माहिती उपलब्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक - महाजन

Women's Chess World Cup : दिव्या-हंपी पहिला डाव बरोबरीत, महिला विश्वकरंडक बुद्धिबळ; दोघींनीही वर्चस्वाची संधी गमावली

Nagpanchami Special Recipe: नागपंचमीला घरच्या घरी बनवा पौष्टिक ज्वारीच्या लाह्या, लगेच लिहून घ्या रेसिपी

प्लीज वाचवा! बँकेतून ९ लाख काढताच तरुणाचं कारमधून अपहरण, २ किमीवर फेकून दिलं; मदतीसाठी ओरडताना बघ्यांनी VIDEO काढला

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT