मुंबई

धारावीकरांना सर्वेक्षणाची आस!

CD

धारावीकरांना सर्वेक्षणाची आस!
हेल्पलाइनवर कॉलचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सुरू असलेले सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ज्यांचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही, त्यांच्यासाठी (डीआरपी) हेल्पलाइन सुरू केली आहे. संबंधितांनी सर्वेक्षणासाठी काॅल केल्यानंतर डीआरपीचे अधिकारी सर्वेक्षण करत आहेत. त्यामुळे आपले सर्वेक्षण पूर्ण व्हावे म्हणून धारावीकरांचे या हेल्पलाइनवर मोठ्या प्रमाणात काॅल येत आहेत. गेल्या महिनाभरात हेल्पलाइनवर ७०० काॅल आले असून, त्यापैकी तब्बल ३०० जणांनी सर्वेक्षणासाठी संपर्क केला आहे.
डीआरपीकडून केल्या जात असलेल्या अंतिम टप्प्यातील सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. घराचे सर्वेक्षण केव्हा होणार, घरावर क्रमांक कधी टाकणार, सर्वेक्षणासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, पूर्वी सहभागी न झालेल्यांना आता सर्वेक्षणात सहभागी होता येईल का, अशा स्वरूपाचे प्रश्न धारावीकर हेल्पलाइनवर विचारत आहेत. त्यानुसार संबंधितांचे सर्वेक्षण केले जात आहे. तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही होत आहे. दरम्यान, धारावीतील १३ कंपाउंड, कुंभारवाडा, खासगी जमिनीवरील काही सदनिका आणि इतर ठिकाणच्या काही सदनिकाधारकांनी अद्याप सर्वेक्षणात सहभाग घेतलेला नाही, मात्र हेल्पलाइन क्रमांकाविषयी केलेल्या जनजागृती मोहिमेनंतर मिळालेला प्रतिसाद पाहता धारावीकरांची डीआरपीच्या माध्यमातून आपल्या हक्काचे घर मिळविण्याबाबतची भावना प्रकर्षाने दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: भारतातील महिलांसाठी हृदय निरोगी राखण्याचा मार्ग – अँजाइनाबाबत सर्व महत्त्वाची माहिती

Cotton Import : कापूस आयात धोरण: जळगावच्या शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार?

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Basmat News : वसमत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत, अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश

China reaction on Nepal Political Crisis: नेपाळमध्ये अराजकता अन् सत्तेची उलथापालथ; अखेर चीनलाही सोडावं लागलं माैन!

SCROLL FOR NEXT