मुंबई

पालघर विमानतळाचा व्यवहार्यता अहवाल सप्टेंबरमध्ये

CD

पालघर विमानतळाच्या व्यवहार्यतेचा अहवाल सप्टेंबरमध्ये

मुंबई, ता. २५ : मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) ग्रोथ हब उभारले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून पालघर जिल्ह्यात वाढवण परिसरात विमानतळ उभारले जाणार असून त्याबाबत महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडून (एमएडीसी) त्याची व्यवहार्यता तपासली जात आहे. त्यांचा अभ्यास अंतिम टप्प्यात आला असून सप्टेंबरअखेर त्याचा अहवाल येणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याने राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळ उभारले आहे. तसेच भविष्याची तयारी म्हणून पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर आणि विमानतळ उभारण्याची राज्य सरकारची योजना आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी आणि व्यवहार्यता तपासण्यासाठी एमएडीसीकडून काम सुरू आहे. त्याबाबतचा अहवाल सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारला सोपवण्यात येणार असल्याची माहिती एमएडीसीच्या एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, पालघर जिल्ह्यात वाढवण बंदरामुळे वाढवण हे एक मोठे लाॅजिस्टिक पार्क म्हणून विकसित होणार आहे. त्याचाच भाग म्हणून येथे विमानतळ विकसित करण्यावर राज्य सरकारचा भर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: अमृतसरमध्ये पाकिस्तानशी संबंधित ५ प्रमुख तस्टकरांना अटक

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT