मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

CD

सत्याग्रह महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांचे सुयश
तुर्भे (बातमीदार) ः खारघरच्या सत्याग्रह महाविद्यालयातील प्रा. सतीश पवार आणि प्रा. रक्षा लादे यांनी यूजीसी नेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. प्रा. पवार हे पाली, संस्कृत व बौद्ध अभ्यास विभागप्रमुख असून रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यातील पाली शिक्षणाचे एकमेव केंद्र असलेल्या सत्याग्रह महाविद्यालयात कार्यरत आहेत. तर प्रा. लादे शिक्षणशास्त्र विभागात कार्यरत असून शैक्षणिक प्रक्रियेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थापक डॉ. जी. के. डोंगरगावकर आणि प्राचार्या प्रा. नेहा राणे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
................
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाडा येथे रक्तदान शिबिर
जुईनगर (बातमीदार) ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सानपाडा शाखेच्या वतीने रविवारी (ता. २७) वात्सल्य ट्रस्ट, स्वामी समर्थ मठ, सानपाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत सुरू राहणार असून जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विठ्ठल मोरे आणि संपर्कप्रमुख एम. के. मढवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
...............
कामोठे येथे वृक्षारोपण
कामोठे (बातमीदार) ः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेक्टर ३५ येथील महाराणी उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात शिक्षक सेना राज्याध्यक्ष आर. बी. पाटील, दक्षिण विभाग अध्यक्ष केरबा सरक, एल वॉर्ड सरचिटणीस सुनील वाक्षे, तसेच अनेक पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
................
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सिंपल आचलिया
पनवेल (बातमीदार) ः इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीच्या अध्यक्षपदी सिंपल आचलिया यांची निवड झाली आहे. आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नवीन कार्यकारिणीमध्ये नम्रता बांठिया (व्हाईस प्रेसिडेंट), युक्ती शहा (सेक्रेटरी), ममता ठक्कर (खजिनदार) यांचा समावेश आहे. आई डे केअर या मतिमंद मुलांच्या शाळेला ४५ हजार रुपयांचा शैक्षणिक निधी चेक स्वरूपात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ध्वनी तन्ना आणि जयश्री मंगलानी यांनी केले.
..........
पनवेल लघुपट स्पर्धेची नावनोंदणी सुरू
नवीन पनवेल, ता. २६ (बातमीदार) ः पनवेल महापालिका १ ऑक्टोबरपासून दशकपूर्ती वर्षात पदार्पण करीत आहे. महापालिकेने गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत विविध विकासात्मक कामे केलेली आहेत. त्या अनुषंगाने ‘प्रगतिशील पनवेल’ या विषयावर आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या संकल्पनेतून लघुपट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. स्पर्धकांनी shortfilmpmc@gmail.com या ई-मेल आयडीवर तसेच मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांच्याशी ९८९२१०८३६५ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून लघुपटाचा कालावधी दहा ते पंधरा मिनिटे एवढाच असेल. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील लघुपट पात्र असतील. त्यात ‘प्रगतिशील पनवेल’ हा विषय केंद्रस्थानी असणे गरजेचे आहे. इच्छुकांना नोंदणीनंतर स्पर्धेच्या अटी व शर्तींबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. स्पर्धेतील २० लघुपटांना तीन लाख ७५ हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. सर्वोत्कृष्ट लघुपटास एक लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्रक सन्मानचिन्ह, द्वितीय लघुपटास ७५ हजार रोख, तृतीय ५० हजार रुपये रोख, उत्तेजनार्थ दोन लघुपटांस प्रत्येकी २५ हजार रोख प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह दिले जाईल. याशिवाय पाच लघुपटांना प्रत्येकी १० हजार तर १० लघुपटांना प्रत्येकी पाच हजार विशेष पारितोषिक दिले जाईल. तर दशकपूर्तीनिमित्त दहा पारितोषिके दिली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Land Scam : बनावट ‘एनए’मुळे नायब तहसीलदार ताब्यात, फुलंब्रीतील प्रकरण; तीन दिवसांची सुनावली न्यायालयीन कोठडी

Bhausaheb Phundkar Yojana : अखेर भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरू, पाच एकरांवरील सधन शेतकऱ्यांना लागवड अनुदानाचा लाभ

Friendship Day 2025: यंदा फ्रेंडशिप डे कधी आहे? जाणून घ्या का असावा जीवनात एक तरी खरा मित्र!

...तर पाकिस्तानशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही खेळू नका; आशिया कपमध्ये भारत-पाक लढतीवरून अजहरुद्दीन संतापले

Eknath Khadse यांच्या जावयाला रेव्हा पार्टीतून उचललं, Girish Mahajan यांनी डिवचलं | Sakal News

SCROLL FOR NEXT