
आशिया कप २०२५च्या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. युएईमध्ये ९ सप्टेंबरपासून ही स्पर्धा खेळली जाणार आहे. याचा अंतिम सामना २८ सप्टेंबरला होणार आहे. चाहत्यांना या वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. भारतात पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. यानंतर पाकिस्तानसोबत कोणत्याही स्पर्धेत न खेळण्याचा भारताचा विचार होता. पण आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबरला होणार असल्याचं आता वेळापत्रकावरून दिसतंय. भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यावरून टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केलाय.