मुंबई

अजूनही ‘मिठी’चे भय कायम

CD

अजूनही ‘मिठी’चे भय कायम
क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील रहिवाशांच्या भावना
विष्णू सोनवणे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मिठी नदीच्या २६ जुलैच्या महापुराला २० वर्षं होत आहेत. मिठीच्या काठावर राहणाऱ्या क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील रहिवाशांना या महापुराचा पहिला फटका बसला. जोरदार पाऊस सुरू झाला की आमच्या काळजात धस्स होते. त्या पुराने आमचे सर्वस्व हिरावले. त्यामुळे जगण्याची पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली, असे स्थानिकांनी सांगितले. आमच्या मनात अजूनही मिठीचे भय कायम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

‘क्रांतीनगर आणि संदेशनगर या आमच्या वस्त्यांना मिठीचा पहिला फटका बसतो. २६ जुलैच्या महापुराचा काहीच अंदाज आला नाही. पवई तलाव भरून वाहू लागल्यानंतर ते पाणी मिठी नदीत शिरले आणि काही कळण्याच्या आत मिठीच्या भरतीचे पाणी आमच्या वस्तीत शिरले. पुराचा पहिला तडाखा आम्हाला बसला. त्यामुळे सामानसुमानही हलविता आले नाही. सगळेच वाहून गेले,’ असे स्थानिक कार्यकर्ते किशोर सोनार यांनी सांगितले. ‘ज्यांची पत्र्याची बैठी घरे होती त्यांनी धोका ओळखून तातडीने स्थलांतर केले. जीव वाचविण्यासाठी बाजूच्या शाळांचा आश्रय घेतला. काही लोकांनी जवळच्या इमारतींमध्ये आश्रय घेतला. ज्यांची घरे दुमजली होती त्यांनी घरे सोडली नाहीत. ते पाऊस थांबण्याची वाट पाहात राहिले. एरवी पाणी पाच फुटांपर्यंत वाढायचे. पण ते त्या दिवशी ९ ते १० फुटांपर्यंत वाढले. दुमजली घरेही पाण्याखाली गेली. घरांवर दीड ते दोन फूट पाणी होते. त्यात महिला, लहान मुले होती. त्यांचे फार हाल झाले. ‘एनडीआरएफ’ने वेळीच मदतीचा हात दिला. त्यामुळे आम्ही वाचलो अन्यथा... त्या आठवणी आम्हाला आजही थरारक वाटतात,’ असेही सोनार यांनी सांगितले.


विहार तलाव भरत आला की मिठी नदीकाठच्या लोकांना पाणी भरण्याच्या धोक्याची माहिती द्यायला हवी; मात्र तसे न झाल्याने आमच्या वसाहती पूर्ण बुडाल्या होत्या. आमचे नुकसान झाले. घरातील सामान बाहेर काढण्यासही उसंत मिळाली नाही. त्यानंतर आम्ही जगण्याची नव्याने सुरुवात केली. अशी वेळ कुणावरही येऊ नये.
- प्रेमसिंग विश्वकर्मा, क्रांतीनगर

पुनर्वसनामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. पुराच्या टप्प्यातील सर्व कुटुंबांचे पुनर्वसन झाल्यास मिठीच्या भयापासून क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील नागरिकांची सुटका होईल. प्रशासनाने पुनर्वसन वेगाने करावे.
- किशोर सोनार, स्थानिक कार्यकर्ते, क्रांतीनगर

मिठीच्या त्या महापुराने अजूनही थरकाप उडतो. पुन्हा असे संकट कोणावरही ओढवू नये, यासाठी सरकारने काळजी घ्यावी. आमचे त्या पुराने खूप नुकसान झाले.
- राजू गुजे, स्थानिक रहिवासी, क्रांतीनगर


पुनर्वसनामुळे सुटका
२०२२पासून क्रांतीनगर आणि संदेशनगर पुनर्वसनाला सुरुवात
कुर्ला येथील प्रीमियम येथे पुनर्वसन
क्रांतीनगरमधील १,६०० पैकी ९०० कुटुंबांचे पुनर्वसन
संदेशनगरमधील २,१०० पैकी ५५० कुटुंबांचे पुनर्वसन

..
जरीमरी भागाला ‘मिठी’चा फटका
मिठीच्या पुराचा फटका बसणाऱ्या संदेशनगर आणि क्रांतीनगरचे स्थलांतर केल्यामुळे स्थानिकांचा धोका टळला आहे. आता जरीमरी भागाला या पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. तेथील स्थानिकांनीही पुनर्वसनाची मागणी केली आहे.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharadi Rave Party: रेव्ह पार्टी आणि सिक्रेट पार्टी यातील फरक काय? खराडीतील खरंच रेव्ह पार्टी होती का?

आता कल्ला होणार! पुन्हा वाढणार कलर्स मराठीचा टीआरपी; लवकरच येतोय 'बिग बॉस मराठी'; वाचा कधी सुरू होतोय कार्यक्रम

Thane Traffic: ठाणे जिल्ह्याची कोंडी सुटणार! वाहतूक नियंत्रणासाठी अधिसूचना लागू; 'या' भागात नो पार्किंग झोन जारी

Konkan Weather Alert : हवामान विभागाचा अंदाज आला, समुद्र खवळला ; मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

Mokhada News : मरणोत्तर मरण यातना, स्मशानभूमी नसल्याने पावसात ताडपत्रीचा आधार घेत अंत्यसंस्कार; मोखाड्यातील भिषण वास्तव

SCROLL FOR NEXT