मुंबई

कंपनीच्या ४५ लाखांवर डल्ला

CD

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : कंपनीचा मालक असल्याचे भासवून एका सायबर चोराने बांधकाम क्षेत्रातील नवी मुंबईतील एका नामांकित कंपनीला तब्बल ४५ लाख ५० हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम क्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या श्री साई डेव्हलपर्सचे वाशी सेक्टर-१७ मध्ये कार्यालय आहे. या कंपनीमध्ये तृप्ती कटके चार वर्षांपासून लेखापाल म्हणून कार्यरत आहेत. या कंपनीचे मालक अभिषेक शर्मा २० जुलै रोजी परदेशात गेले होते. याचदरम्यान सायबर चोराने संधी साधत कंपनीचा मालक असल्याचे भासवून एका मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे तृप्ती यांच्याशी संपर्क साधला. हा माझा नवीन नंबर असल्याचे सांगताना कंपनीच्या खात्यातील पैसे वळते करण्यात आले.
-------------------------
आठ बँक खात्यांमधून रक्कम वळती
अभिषेक शर्मा यांचा इतर कर्मचाऱ्यांशी नियमित नंबरवरून संवाद सुरू असल्याने कटके यांना संशय आला. त्यानंतर कंपनीतील एका सहकाऱ्याच्या मदतीने शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर कोणताही नवीन नंबर नसल्याचे स्पष्ट झाले होते, पण तोपर्यंत आठ बँक खात्यातील तब्बल ४५ लाख ५० हजारांची रक्कम काढण्यात आली. याप्रकरणी एनसीसीआरपी पोर्टलसोबतच वाशी पोलिस ठाण्यातही शनिवारी (ता. २६) तक्रार दाखल करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार घसरला; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले

IND vs ENG 5th Test: इंग्लंडच्या संघात 'तो' परतला; टीम इंडियाला पाचव्या कसोटीत 'वेगवान' माऱ्याने हैराण करणार

Latest Maharashtra News Updates : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेचा आज दुसरा दिवस

Ahilyanagar News:'शिवपिंडीवर २७० तास अभिषेकाचा संकल्प'; रोज नऊ तास आराधना; सोनईमधील श्री स्वामी समर्थ केंद्राचा उपक्रम

Rucha Mahamuni Debuts in Marathi Cinema: ऋचा महामुनीचा आवाज आता मराठी चित्रपटामध्ये

SCROLL FOR NEXT