
परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) तब्बल 5,100 कोटींची विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) 6,800 कोटींची खरेदी करून बाजाराला आधार दिला.
औद्योगिक उत्पादन (IIP) 10 महिन्यांच्या नीचांकावर – जूनमध्ये वाढ फक्त 1.5%, खनन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील सुस्तीमुळे आर्थिक वाढीवर परिणाम.
ट्रम्प यांनी रशियाला दिलेल्या अल्टिमेटममुळे जागतिक बाजारात खळबळ, कच्चे तेल 2.5% वाढून 69 डॉलर्स पार, सोने 25 डॉलर्सने घसरले.
Stock Market Opening Today: शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड आज सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. आज बाजार उघडताच बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स कोसळला. त्याच वेळी निफ्टी 50 मध्येही घसरण दिसून येत आहे. सुरुवातीला बाजारात सेन्सेक्स सुमारे 180 अंकांनी घसरला आहे, ज्यामुळे गेल्या 4 दिवसांत गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.