मुंबई

खेळण्यासाठी पैसे न दिल्याने सावत्र आईची हत्या

CD

खेळण्यासाठी पैसे न दिल्याने सावत्र आईची हत्या
फरशीवर पडल्याचा बनाव; चार आरोपी अटकेत
नालासोपारा, ता. २८ ( बातमीदार) : ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे न दिल्याने रागाच्या भरात मुलाने आपल्या सावत्र आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार वसई पश्चिम डिमार्टजवळील पेरियार अपार्टमेंटमध्ये शनिवारी (ता. २६) सकाळी घडला. ही हत्या लपवण्यासाठी आरोपी मुलाने वडील, चुलत्याची मदत घेऊन डॉक्टरकडून चुकीचा मृत्यू दाखला घेतला. त्यानंतर मृतदेह स्मशानभूमीत पुरला. याप्रकरणी वसई गुन्हे शाखा कक्ष २च्या पथकाने या हत्येचा उलगडा करून सोमवारी (ता. २८) आरोपींना अटक केली.

मुलगा इम्रान खुसरू, वडील अमीर खुसरू, चुलता सलीम खुसरू तसेच डॉ. आर. आर. गर्ग अशी अटक आरोपींची नावे आहेत. आर्शिया खुसरू (वय ६१) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, ती पेशाने वकील होती आणि उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी इम्रान हा वसई पूर्व भातपाडा गोखीवरे येथे राहतो, तर त्याची सावत्र आई ही वसई पश्चिम डिमार्टजवळील इमारतीमध्ये राहत होती. आरोपीने आईच्या घरी जाऊन एक लाख ८० हजार रुपयांची मागणी केली. पण आईने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून इम्रानने आर्शिया यांचे डोके भिंतीला आपटून आणि नंतर लाथाबुक्क्या मारून तिला गंभीर जखमी केले. यामध्ये आर्शिया यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने कपाटातून दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक चेनही चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी इम्रान हा ऑनलाइन गेम खेळायचा. त्याला टेलिग्रामवरून या गेमचा मॅसेज आला होता. त्याला गेम खेळण्यासाठी एक लाख ८० हजारांची गरज होती आणि ते पैसे मागण्यासाठी गेला असता त्याला दिले नाहीत, म्हणून त्याने रागाच्या भरात ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आम्ही प्रथम मुलगा आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेऊन अधिक तपासासाठी वसई पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक समीर अहिरराव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''आता बास करा.. खूप मार बसला'' भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानचे डीजीएमओ काय म्हणाले होते? मोदींनी सांगितलं

''ऑपरेशन सिंदूर' थांबवण्यासाठी मला कुणीही फोन केला नाही, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा फोन आला तेव्हा..'' मोदींनी लोकसभेत सांगितला किस्सा

PM Modi Parliament : ‘’ज्यांना भारताची बाजू दिसत नाही त्यांना मी...’’ ; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत थेट इशारा!

Rahul Gandhi: ''मोदींमध्ये हिंमत असेल तर...'', ट्रम्प यांचं नाव घेऊन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

Latest Maharashtra News Updates: मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱ्यांवर ओतूर पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT