मुंबई

नागमोडी वळणावर ट्रेलरला अपघात

CD

कुडली गावाच्या हद्दीत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे दुर्घटना
रोहा, ता.२९ (बातमीदार)ः सुतारवाडी पुलाचे संरक्षण कठडे तुटल्याने ट्रेलर पलटी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती कुडली गावाच्या हद्दीत लोखंडी कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर पलटी झाला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेबरोबरच नागमोडी वळणांमुळे वाहनांच्या अपघातांचे सत्र सुरूच आहे.
सुतारवाडी मार्गे विले-भागाड येथील कंपनीत २४ टनाच्या दोन कॉईल घेऊन जाणारा ट्रेलरला कुडली बस थांब्याजवळ रस्त्याचा अंदाज आला नसल्याने पलटी झाला होता. या घटनेत जीवितहानी टळली. पण भिराफाटा-सुतारवाडी ते विले-भागाड या भागातील नागमोडी वळणे, रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेने वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवणे चालकांना अवघड होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सुतारवाडी परिसरामध्ये अनेक शाळा आहेत. त्यामुळे अपघाताच्या वाढत्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
--------------------------------
रास्ता-रोकोचा इशारा
सुतारवाडी रस्त्यावर ट्रेलर पलटी होण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे रस्त्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात ग्रामस्थ रास्तारोको केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा शिवशंभो ज्येष्ठ नागरिक संघ सुतारवाडीचे अध्यक्ष मनोहर साळवी यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT