मुंबई

बाईक अपघातात खांद्याना दुखापत २० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये नसा तुटण्याचे प्रमाण वाढते

CD

दुचाकी अपघातात नसांना सर्वाधिक दुखापत
७० टक्के प्रमाण; दुर्लक्ष केल्यास हात लुळा पडण्याचा धोका
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : देशात दरवर्षी होणाऱ्या अपघातांमध्ये दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही अपघातात हाताच्या नसा तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकदा हात लुळा पडणे किंवा लकवा होण्याची शक्यता असते. दुचाकी अपघातात नस तुटण्याचे प्रमाण ७० टक्के असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत जळगाव येथील ६४ वर्षीय ईश्वर रूपचंद राजपूत यांच्या मणका आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांचा हात खांद्यापासून हलत नव्हता. अखेर त्यांच्यावर ‘ब्रेकियल प्लेक्सस’ शस्त्रक्रिया करावी लागली. अनेकदा दुचाकीचा अपघात झाल्यावर किरकोळ दुखापत झाल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते; मात्र अशा अपघातात हाताच्या नसेला गंभीर दुखापत होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे ब्रेकियल प्लेक्ससची समस्या उद्भवते. अपघात झाल्यावर तातडीने वैद्यकीय तपासण्या केल्यास पुढील अनर्थ टाळता येतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
-----
‘ब्रेकियल प्लेक्सस’ म्हणजे काय?
ब्रेकियल प्लेक्सस हा मज्जातंतूचा समूह असून, तो पाठीच्या कण्यापासून खांदा, हाताला संदेश पाठवतो. ज्या वेळी यातील पाच नसा ताणल्या जातात, त्यावर दाब पडतो किंवा त्यास दुखापत होते, तेव्हा रुग्णांमध्ये हात निकामी होण्याची शक्यता असते.
......
अपघातात नसांना दुखापत झाल्यास हात लुळा पडतो किंवा त्यास अपंगत्व येते. प्रसंगी लकव्यासारखी स्थिती होते. सहा महिन्यांमध्ये योग्य उपचार न घेतल्यास मांसपेशी निकामी होतात. त्यामुळे अपघातानंतर तातडीने एमआरआय आणि नसांची तपासणी करायला पाहिजे.
- डॉ. सागर गुंडेवार, युनिट प्रमुख, प्लॅस्टिक सर्जरी, सेंट जॉर्ज रुग्णालय
......
कशी पार पडते शस्त्रक्रिया?
- तुटलेल्या नसांना थेट जोडणे
- खराब झालेला भाग काढून त्यावर नर्व ग्राफ्ट शस्त्रक्रिया
- पूर्ण नसेचे प्रत्यारोपण
- १० ते १२ तासांची शस्त्रक्रिया
- पाचपैकी दोन नसा तुटल्या तरी ९० टक्के उपचार
- महिनाभरात एक इंच नसेची वाढ
.....
उपचार महागडे
- खासगी रुग्णालयात किमान पाच, कमाल आठ लाखापर्यंत खर्च
- सरकारी रुग्णालयात शासकीय योजनेतून उपचार मोफत
- शस्त्रक्रियेसाठी केवळ १५ ते २० हजारांचा खर्च
......
प्रतिबंधात्मक उपाय
- वेगावर नियंत्रण राखणे
- हेल्मेटचा वापर करावा
- सुरक्षा साधनांचा वापर करावा
- वाहतुकीच्या नियमांचे पालन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यासंदर्भात पुरवठा विभागाचे महत्त्वाचे आदेश

Pune District: डिझेलच्या तुटवड्याने शेतकरी हैराण; बहुतांश पंपांवर वाहनांच्या रांगा; मर्यादित प्रमाणात वाटप

Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

Video: 'मला तुमची कीव येते...', श्रेयस अय्यरच्या बहिणीने त्या Video वरून तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर

Latest Marathi News Live Update : ‘आयपीएल’वर सट्टेबाजीचे रॅकेट उघड, इचलकरंजीत सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT