मुंबई

टँकरच्या पाण्यावर चालतेय धुणी-भांडी

CD

कामा रुग्णालयात पाण्याची टंचाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : ऐन पावसाळ्यात सीएसएमटी येथील कामा रुग्णालयात सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. रुग्णालयातील पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या महापालिकेच्या मुख्य वाहिनीमधून अपुरा पुरवठा होत असल्याने रुग्णालय प्रशासनाला मोठ्या प्रमाणात टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीची एक ते दीड लाख लिटर इतकी क्षमता आहे. त्यात केवळ ४० टक्के पाणी महापालिकेकडून येत आहे. त्यामुळे उर्वरित पाण्याची सोय टँकरच्या माध्यमातून केली जात आहे.

जलवाहिनीतील बिघाडामुळे यापूर्वीही पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. त्यामुळे रुग्णालयाच्या सर्व इमारतींमधील पालिकेच्या मुख्य जलवाहिनीमधून येणारे सर्व पाइप बदलण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला, पण गेल्या महिनाभरापासून पुन्हा पुरवठा आणि दाब कमी झाल्याचे कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रुग्णालयात एकूण सहा इमारती आहेत. याशिवाय अन्य कर्मचाऱ्यांच्या निवासी इमारती धरून एकूण १० ते ११ इमारती आहेत. या सर्व इमारतींना मिळून दररोज सुमारे एक लाख ते सव्वा लाख लिटर पाण्याची गरज असते. महापालिकेकडून होणारा ४० टक्के पाण्याचा अपुरा पुरवठा टँकरने भरावा लागतो. हे पाणी धुणी, लादी पुसणे, वॉशिंग मशीनसाठी वापरले जाते, तर पिण्यासाठी बिसलरीसारख्या बाटलीबंद पाण्याचा वापर करावा लागत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या राहत्या घरांमध्येही पाणी पुरेशा प्रमाणात जात नाही. त्यांनादेखील टँकरच्या पाण्यावरच भागवावं लागतंय. बोरिंगचे पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठा किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : दिल्लीत 'क्वाड'च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

SCROLL FOR NEXT