मुंबई

प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

CD

प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त, माथाडी कामगार, अल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि झोपडपट्टीवासीयांना वाढीव बांधकामाप्रकरणी सिडको व नवी मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिसांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने (शरदचंद्र पवार गट) गुरुवारी (ता. ३१) सिडको व महापालिकेच्या मुख्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सीवूड्स सेक्टर न्यू-५० येथील गंगारामशेठ तांडेल चौकातून निघून सिडको आणि नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर धडकणार आहे. हे आंदोलन माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.
विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून, यात गृहनिर्माण व जमिनीचे नियमन, स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे आणि त्याखालील जमिनींचे कायदेशीर नियमन सिडको व महापालिकेने त्वरित करावे. नवी मुंबई महापालिका, सिडको आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पांमध्ये स्थानिक बारवी प्रकल्पग्रस्तांना स्थायी नोकऱ्या मिळाव्यात. सिडकोकडे राखून ठेवलेले ३.७५ टक्के सामाजिक सुविधा भूखंड प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक उपयोगासाठी वाटप करावेत. नवी मुंबईतील विकसकांना विक्री केलेले समाजोपयोगी भूखंड नागरिकांच्या हितासाठी महापालिकेला हस्तांतरित करावेत, आदी मागण्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरी, मंत्र्याच्या कॅबिनमधून ८० हजार रुपये लंपास...

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

Thane Crime: ‘प्रेम’ बनलं सापळा! १४० हून अधिक तरुणींची फसवणूक; ‘लव्ह स्कॅम’चा मास्टरमाइंड अटकेत

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT