मुंबई

कोळी राजा दर्याकडे झेपावणार

CD

कोळी राजा दर्याकडे झेपावणार
तुर्भे, ता. ३० (बातमीदार): नारळी पौर्णिमेच्या सणासाठी नवी मुंबई आणि परिसरातील कोळीवाडे आणि ठिकठिकाणच्या जेट्टी सजल्या आहेत. किनारपट्टीवरील कोळीबांधवांची सक्तीची विश्रांती संपत आली असून, पोटाची खळगी भरण्यासाठी कोळीवाड्यात मच्छिमारांची खोल समुद्रात पारंपरिक मासेमारीसाठी आपल्या होड्या समुद्रात लोटण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर एक ऑगस्टपासून एक नवी आशा घेऊन आई एकविरा आणि जय मल्हारच्या जयघोष करत कोळी राजा दर्याकडे झेपावणार आहे. यासाठी, नवी मुंबईतील दिवाळे कोळीवाडा, बेलापूर, सरसोळे, करावे, वाशी गाव, जुहूगाव, बोनकोडे, कोपरखैरणे, दिवा कोळीवाडा येथील मच्छिमारांची लगबग सुरू झाली आहे.
गेली दोन महिने पाऊस, वादळीवारा आणि समुद्राच्या उधाणामुळे किनारपट्टीवर मासेमारी बंद होती. त्यामुळे मच्छिमारांनी त्यांच्या बोटी बंदर किनारपट्टीवर नांगरून ठेवल्या होत्या. मासेमारी बंदीचा कालावधी ३१ जुलैला संपुष्टात येणार आहे. तर शुक्रवारपासून (१ ऑगस्ट) नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मासेमारीच्या नव्या हंगामाची मच्छीमार सुरुवात करणार आहेत. यासाठी कोळीवाड्यात लगबग सुरु झाली आहे. बोटीची डागडुजी, इंधन दुरुस्ती, रंगरंगोटी आणि मच्छीमार जाळ्यांची देखभाल, आणि होड्यांना तेल लावणे अशी अन्य तत्सम कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.
दरम्यान, पूर्वी लाकडी बोटी असल्याने मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करावी लागायची. मात्र, आता अनेक मच्छीमार फायबर बोटींवर अवलंबून असल्याने डागडुजीचा खर्च त्या तुलनेने कमी झाला असल्याचे डोलकर मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष तुकाराम कोळी यांनी संगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: पेविंग ब्लॉकच्या खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेला; पुण्यातल्या 'या' मृत्यूला कोण जबाबदार?

Anil Ambani: अनिल अंबानींची ईडी करणार चौकशी; 17 हजार कोटींचा कर्ज घोटाळा, तपासात काय आढळले?

Tarot Horoscope August 2025: राज राजेश्वर योगामुळे मेष, मिथुनसह ४ राशींना लाभ; वाचा ऑगस्टचे टॅरो राशीभविष्य

Solapur News:'शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांचा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा'; निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी

August Long Weekend: ऑगस्टमध्ये लॉंग वीकेंड प्लॅनिंग करताय? मग 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा, आनंद दुपटीने वाढेल!

SCROLL FOR NEXT