मुंबई

अल्पवयीन दुचाकीस्वारांच्या संख्येत वाढ

CD

बदलापूर, ता. ३० (बातमीदार) : शहरातील रस्त्यांवर सुसाट आणि सर्रास दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन दुचाकीस्वारांची संख्या वाढली आहे. वाहतूक पोलिसांची यावर काहीच कारवाई होत नसल्याने, हा प्रकार वाढीस लागत असल्याची टीका केली जात आहे. यात निष्पाप जीवांचा अपघात घडल्यास वाहतूक पोलिस कारवाई करणार का? असा सवाल बदलापूरकर उपस्थित करत आहेत.
सध्याची बदलती पिढी आणि त्यातच लहान वयातच चुकीचे हट्ट वाढत आहे. हे हट्ट पुरविण्यासाठी पालकही नियम तोडून मुलांना सर्रास दुचाकी चालवायला देतात. वस्तू विकत आणणे, घरच्या इतर कोणत्या कामांसाठी, शाळेत जाण्यासाठी अल्पवयीन मुले दुचाकी घेऊन रस्त्यांवर सुसाट जात असतात. त्यात सहकाऱ्यांसोबत तीन किंवा जास्तीत जास्त पाच जणांना बसवून जीवघेणा प्रकार त्यांच्याकडून होतो. शहरातील सगळ्याच रस्त्यांवर हा प्रकार पाहायला मिळत आहे. वाहतूक पोलिस याकडे कानाडोळा करत असल्याचे समोर येत आहे. आपल्यावर कोणती कारवाई होत नाही हे पाहूनच अल्पवयीन मुले बिनधास्त दुचाकी चालवत आहेत. हा प्रकार अपघाताला कारणीभूत ठरू शकतो, याची कल्पना पालक आणि वाहतूक पोलिसांना असूनही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे दिवसागणिक अल्पवयीन दुचाकीस्वारांची संख्या वाढत आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांतील शाळा प्रशासनाला या संदर्भात सूचना करत आहोत. शाळेमध्ये पालक सभा असताना वाहतूक पोलिसांना बोलावून पालकांना जागरूक करण्यासाठी आणि संबंधित धोके पटवून देण्यासाठी शाळेत येऊ, असेही शाळा प्रशासनाला सांगितले आहे. त्याचबरोबर सेवा बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांनाही अशा अल्पवयीन मुलांना समाज देऊन त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
- विजय पुराणिक,
वाहतूक पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President Election : ठरलं! ९ सप्टेंबर रोजी देशाला मिळणार नवे उपराष्ट्रपती, निवडणूक कार्यक्रम जाहीर...वाचा संपूर्ण वेळापत्रक

Pune Crime : जमिनीच्या वादातून चुलत भावावर गोळीबार, वाघोली जवळील घटना; बेकायदा पिस्टलचा वापर, तरुणाची प्रकृती स्थिर

Video Vantara Team : 'वनतारा'च्या टीमला कोल्हापुरात आणण्यासाठी कृष्णराज महाडिकांचा प्रयत्न; म्हणाले, 'नांदणीत सर्वजण या...'

Latest Marathi News Updates Live: उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक ९ सप्टेंबरला; उमेदवारीसाठी २१ जुलैपर्यंत मुदत

Nagpur Municipal Schools: मनपा शाळांना सेमी इंग्रजीचे वावडे; आधुनिक काळात मातृभाषेसोबतच इंग्रजी शिक्षणाची गरज, तज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT