शेअर ट्रेडिंगच्या प्रलोभनाने १३ लाखांचा गंडा
उल्हासनगर, ता. ३१ (वार्ताहर) ः‘शेअर बाजारात पैसे गुंतवा, भरघोस परतावा मिळवा’ अशा आकर्षक पोस्ट, इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्युबवरचे शॉर्ट व्हिडिओ पाहून अनेक जण शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली अनोळखी व्हॉट्सअॅप किंवा टेलीग्राम ग्रुप्समध्ये सहभागी होत आहेत. अशाच एका ऑनलाइन फसवणुकीत उल्हासनगरातील ३१ वर्षीय व्यक्तीला तब्बल १३ लाख ७८ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला असून, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर १ परिसरातील भावेश मुलचंदाणी हे एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील झाले होते. याच ग्रुपमधील आरोही पाटील या नावाने एका मोबाईल नंबरवरून त्यांना संपर्क करण्यात आला. अनोळखी व्यक्तीने शेअर बाजारात मोठा परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून ‘३६० एचएनडब्लू’ नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार भावेश यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण १३.७८ लाख रुपये ट्रान्स्फर केले; मात्र काही दिवसांनी संबंधित व्यक्तीचा संपर्क तुटला. अॅप बंद झाले आणि पैसेही परत मिळाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. उल्हासनगर शहरातच यापूर्वीही एका महिलेला ३४ लाखांची अशीच ऑनलाइन फसवणूक झाली होती. यावरून हे फसवणूक टोळ्यांचे नेटवर्क मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे स्पष्ट होते.
गुन्हा दाखल
फसवणूक झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी वारंवार नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही ‘जलद आणि दुप्पट परताव्याच्या’ प्रलोभनांना बळी न पडता अधिकृत आणि खात्रीशीर मार्गानेच गुंतवणूक करावी. तसेच गुंतवणूक तज्ज्ञांचेही मत आहे की, कोणीही अधिक परतावा देतो असे म्हणत असेल, तर अशा व्यक्ती किंवा संस्थेची पारदर्शकता, परवाना, अनुभव आणि आर्थिक ट्रॅक रेकॉर्डची खातरजमा करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.