मुंबई

अण्णा भाऊंचे साहित्य प्रकाशकांच्या भरवशावर

CD

अण्णा भाऊंचे साहित्य
प्रकाशकांच्या भरवशावर
समितीकडे मूळ दस्तऐवजच नाहीत
मुंबई, ता. ३१ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची साहित्यसंपदा सर्वसामान्य वाचक आणि मराठी भाषाप्रेमींपर्यंत पोहोचवण्यासाठी अकरा वर्षांपूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समिती स्थापन करण्यात आली. या समितीकडे साठे यांच्या साहित्याची एकही मूळ प्रत अथवा त्याचे दस्तऐवज उपलब्ध नाहीत. समितीने आतापर्यंत सर्व खंड विविध प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेल्या साहित्यावर आधारावर प्रकाशित केले. त्याचा संदर्भही समितीने नोंदवला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात पहिल्यांदा समग्र रूपाने साठे यांच्या साहित्याचे निवडक वाङ्‌मय हे राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने १९९८मध्ये प्रसिद्ध केले होते. याचे संपादन ज्येष्ठ साहित्य‍िक अर्जुन डांगळे आदींमार्फत करण्यात आले होते. त्यानंतर २०१४ साली तत्कालीन सरकारने साठे यांच्या अप्रकाशित साहित्याचे नव्याने मुद्रण करून ते वाचकांना देण्याच्या उद्देशाने चरित्र साधने समितीची स्थापना केली होती. या समितीचे प्रा. राजेंद्र कुंभार, जालिंदर कांबळे, मल्लिका अमरशेख, प्रा. संजय शिंदे यांनी कामकाज पाहिले. यात सर्वाधिक काळ विद्यमान सदस्य सचिव प्रा. शिंदे यांना लाभला. त्यांच्या काळात साठे यांच्या आतापर्यंत अप्रकाशित असलेल्या साहित्यातील एकही पान प्रसिद्धीस येऊ शकले नसल्याची खंत साहित्यिक वर्तुळातून व्यक्त होते.

साडेचार वर्षांत सात खंड प्रसिद्ध झाले असले तरी त्यातील बहुतांश साहित्य यापूर्वी खासगी प्रकाशन संस्थांनी अनेकदा प्रसिद्ध केले आहे. याशिवाय स्वतः समितीनेही सुरुवातीच्या काळात तेच साहित्य प्रकाशित केले आहे. यामुळे समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
--
साठे यांच्या साहित्याचे आतापर्यंत निघालेल्या खंडांसाठी आमच्याकडे त्यांच्या लिखाणाची मूळ प्रत समितीकडे उपलब्ध नाही. यापुढे अप्रकाशित साहित्याचा शोध घेऊन ते प्रसिद्ध करण्याची आमची तयारी आहे.
- प्रा. संजय शिंदे, सदस्य सचिव,
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समिती
--
साठे यांचे मूळ लेखन लोकवाङ्‌मय गृहाने प्रसिद्ध केले. त्यातीलच साहित्याचे पुनर्प्रसिद्धी सध्या समितीच्या खंडातून होते. यामुळे समितीने साठे यांचे मूळ साहित्य कम्युनिस्ट संस्थांनी प्रसिद्ध केले, त्यांच्याकडे जाऊन शोध घेण्याची तसदी घ्यायला हवी.
- कॉ. सुबोध मोरे, अभ्यासक
--
सहा महिन्यांचाच कालावधी मिळाला होता; पण मी साठे यांच्या साहित्याचे इंग्रजीत अनुवाद करण्याचा प्रस्ताव आणून तो पुढे नेला होता. सर्व साहित्य जगभरात पोहोचावे, असा त्यामागील प्रयत्न होता.
- जालिंदर कांबळे, माजी सदस्य सचिव‍
--
देशातील ४५ ग्रंथालयांत शोध घेऊन साठे यांच्या विविध साहित्यांचे मुखपृष्ठ, साहित्यप्रती मिळवल्या. त्यानंतर १९ कादंबऱ्यांचे दोन खंड प्रकाशित केले होते. यात समीक्षणात्मक प्रस्ताव लिहिणे, तपासणी करण्याचे काम आपल्या कार्यकाळात झाले.
- प्रा. राजेंद्र कुंभार, माजी सदस्य सचिव
--
प्रकाशनाचा प्रवास
- साठे यांची बहुतेक गाणी, पोवाडे, कथा-कादंबरी, लोकनाट्य लोकसाहित्य प्रकाशन, अभिनव प्रकाशन, पीपल्स पब्लिशिंग हाउस आणि लोकवाङ्‌मयगृह प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत.
- अभिनव प्रकाशनानेच फकिरा कादंबरी, खुळवाडी व अन्य कथासंग्रही प्रकाशनाच्या वा. वि. भटांनीच केले होते.
- नंतरच्या काळात कोल्हापूर, पुण्याच्या विद्यार्थी प्रकाशन, शेट्ये प्रकाशनाने अन्य पुस्तके प्रकाशित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut: एक शेतकरी नडला 'कंगना'ला भारी पडला... उच्च न्यायालयाकडून मोठा झटका! खटला रद्द करण्यास नकार; जाणून घ्या प्रकरण?

Bombay High Court: मित्राला पतीचा नातेवाईक म्हणता येणार नाही; उच्च न्यायालय, हुंडा छळ प्रकरणातील गुन्हा रद्द

Latest Maharashtra News Updates : महिला अत्याचारप्रकरणी माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी; आज सुनावली जाणार शिक्षा

11th Admission : हुशार विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित; सर्वांसाठी खुल्या फेरीत अकरावी प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता

Fake Shalarth ID Scam: न्यायालयाचे आदेश असूनही अटकेची कारवाई; शिक्षण सचिवांची पोलिस अधिकाऱ्यांना नाराजीची फोनवार्ता

SCROLL FOR NEXT