बेवारस वाहने वाहतुकीसाठी अडथळे
पालिकेकडून मुंबईकरांसाठी तक्रार करण्याची सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईत ठिकठिकाणी बेवारस वाहने वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. बेवारस वाहनांसाठी आता मुंबईकरांना ऑनलाइन तक्रार करण्यासाठी मुंबई महापालिकेने सुविधा उपलब्ध केली आहे.
मुंबईकर १९१६ क्रमांक, https://www.mcgm.gov.in संकेतस्थळासह शहर विभागासाठी मेसर्स आईफ्सो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड - ७५०५१२३४५६, पूर्व उपनगरांसाठी मेसर्स रझा स्टील - ९८१९५४३०९२ आणि पश्चिम उपनगरांसाठी मेसर्स प्रदीप ट्रेडिंग कंपनी - ८८२८८९६९०३ या नेमून दिलेल्या कंत्राटदारांकडे तक्रार करू शकणार आहेत.
मुंबईत रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस, भंगार वाहनांची ओळख पटवून नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. पालिका प्रशासन आणि कंत्राटदारमार्फत नियमितपणे ही कारवाई सुरू आहे. मुंबईकर नागरिकदेखील बेवारस वाहनांची तक्रार करू शकतात. सार्वजनिक रस्त्यावर बऱ्याच कालावधीसाठी बेवारस पडून असलेली वाहने लक्षात आल्यास नागरिकांनी कंत्राटदारांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर वाहनाचे छायाचित्र व गुगल लोकेशनसह तक्रार करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
...तर कुठलाही दावा करता येणार नाही
वाहनमालकाने नोटीस बजावल्यापासून ७२ तासांच्या आत वाहन सार्वजनिक रस्त्यावरून हटवले नाही, तर हे वाहन ‘टोईंग’ करून कंत्राटदाराच्या यार्डमध्ये नेण्यात येत आहेत. तसेच, ३० दिवसांनंतर या वाहनाची विल्हेवाट लावली जात आहे. त्याबाबत कुठलाही दावा करता येत नाही. त्यामुळे टोईंग करून यार्डमध्ये जमा केलेले वाहन हवे असल्यास वाहनमालकांनी ३० दिवसांत देय दंडाची रक्कम भरावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.