मुंबई

टोल फ्री क्रमांकावर करा खड्ड्यांची तक्रार

CD

टोल फ्री क्रमांकावर करा खड्ड्यांची तक्रार
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेची नवी मोहीम

कल्याण, ता. ३ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली शहरातील डांबरी रस्त्यांची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यात पावसामुळे रस्त्यातील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेमार्फत सुरू आहे. त्यामुळे ज्या भागात खड्डे आहेत, त्याची माहिती नागरिकांनी महापालिकेला द्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. यासाठी १८०० २३३ ००४५ हा टोल फ्री क्रमांक दिला असून तो २४ तास सुरू असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महापालिका हद्दीत एकूण ४२२ किलोमीटर लांबीचे रस्ते असून त्यातील ८० किमीचे रस्ते काँक्रीटचे असून उर्वरित सर्व रस्ते डांबरी आहेत. शहरात सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत असून डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवणे आवश्यक असते; मात्र यंदा महिनाभर आधीच पावसाने सुरुवात केल्याने १०० टक्के खड्डे बुजवता आले नाहीत. त्यातच सततच्या पावसामुळे पडलेले खड्डे बुजवणे अशक्य असल्याने तात्पुरत्या स्वरूपात डांबर मिक्स खडी वापरली जाते. ज्यामुळे काही दिवसांतच खडी रस्त्यावर पसरून पुन्हा खड्डा पूर्वीप्रमाणे होतो.

महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गणरायाचे आगमन होणार आहे. त्यापूर्वीच तीन आठवड्यांतच रस्ते दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान महापालिकेकडे आहे. खड्डे बुजविण्यासाठी महापालिका जवळपास ३० कोटी खर्च करणार असून कंत्राटदारही नेमल्याची माहिती आहे. पावसात खड्डे बुजविण्यासाठी कोल्ड मिक्स तसेच मास्टिक अल्फास्टिंगचा वापर करण्यात यावा, जेणेकरून खड्डे पुन्हा उखडणार नाहीत, अशा सूचना नागरिकांकडून केल्या जात आहेत. नागरिकांनी टोल फ्री क्रमांकावर खड्ड्यांची माहिती देऊन खड्डेमुक्त व सुरक्षित शहर बनविण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

Pune Crime : बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक; आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार प्रवाहची नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'चा प्रोमो समोर; ईशा केसकर नाही 'ही' अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

Navi Mumbai: पोलिसांचा गुन्हेगारांना दे धक्का! अवैध कारभाराविरुद्ध १४ आरोपींवर गुन्हे दाखल; घणसोलीत धडक कारवाई

Ajit Pawar News: V.K. सिंह यांचं अंडरवर्ल्डशी संबंध, मिटकरींकडे कोणते पुरावे?

SCROLL FOR NEXT