मुंबई

शहापूरमध्ये पॉक्सो कायदेविषयक जनजागृती

CD

शहापूरमध्ये पॉक्सो कायदेविषयक जनजागृती
शहापूर (वार्ताहर) : बालकांविरोधातील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर साक्षरता निर्माण करण्यासाठी पॉक्सो कायद्यावर विशेष जनजागृती कार्यक्रम आटगाव विभाग हायस्कूलमध्ये घेण्यात आला. डॉ. पूर्णिमा सुर्वे यांनी कायद्याची माहिती अतिशय सहज समजण्यासारख्या भाषेत विद्यार्थ्यांना दिली. वाईट स्पर्श आणि प्रेमळ मायेचा स्पर्श कसा ओळखावा आणि कोणती दक्षता घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी कायद्याचे मूलभूत ज्ञान घेऊन सामाजिक भान ठेवावे आणि स्वतःचा व इतरांचा सन्मान राखावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य वैभव गवाळे, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे, मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सायबर फसवणुकीचा नवा फंडा, दहशतवाद्यांशी संबंध असल्याची भीती दाखवून महिलेला घातला 73 लाखाचा गंडा

भाजपच्या आक्षेपामुळे ऐन तारुण्यात गमावलेलं मंत्रिपद, आज त्याच भाजपनं मुख्यमंत्री बनवलं; कोण आहेत सम्राट चौधरी?

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

'तन्वीने मूर्खपणा केला…''त्या' वक्तव्यामुळे प्रेक्षक नाराज, नेटकरी म्हणाले...'हिला वोट करु नका'

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT