मुंबई

मालमत्ता कर केंद्राला नागरिकांचा प्रतिसाद

CD

मालमत्ता कर केंद्राला नागरिकांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : महापालिका हद्दीतील नागरिकांना करदात्यांना कर भरणा करणे सोपे व्हावे, यासाठी पालिकेने विशेष कर भरणा केंद्रे सुरू केली आहेत, शिवाय सुट्टीच्या दिवशीदेखील ही केंद्रे सुरू ठेवली होती. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, १५ लाख ३८ हजारांचा कर भरणा तीन प्रभागांतून केला आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील नागरिकांना, करदात्यांना मालमत्ता व पाणीपट्टी रकमेचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महापालिकेने प्रभाग क्षेत्रांतील नागरिक सुविधा केंद्रांव्यतिरिक्त सर्व प्रभागातील एकूण १८ ठिकाणी विशेष कर भरणा केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच ३१ ऑगस्टपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मालमत्ता करात पाच टक्के सवलतही दिली आहे.

त्या अनुषंगाने शनिवारी कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीदेखील अ, फ व ग प्रभागातील नागरिकांनी या विशेष भरणा केंद्रात रोख रकमेच्या स्वरूपात, धनादेशाद्वारे आणि ऑनलाइन स्वरूपात सुमारे १५ लाख ३८ हजार ८९७ इतका कर भरणा केला आहे. यापैकी अ प्रभागात सात लाख ५३ हजार ४३८ इतका मालमत्ता कर व पाणीपट्टीचा भरणा नागरिकांमार्फत करण्यात आला आहे. फ आणि ग प्रभागात सात लाख ८५ हजार ४५९ इतका मालमत्ता व पाणीपट्टीचा भरणा केला आहे. मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी अ प्रभागातील अटाळी चौक या ठिकाणी आणि फ प्रभागातील आदित्य मंगल कार्यालय परिसरात असलेल्या कर भरणा केंद्रास समक्ष भेट देऊन करवसुली प्रक्रियेची पाहणी केली. या वेळी अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील आणि फ आणि ग प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT